agriculture news in Marathi rain and hailstorm in several places in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

ठिकठिकाणी गारपीट, पावसाचा दणका 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

पावसामुळे शेतातील कांदा, द्राक्ष, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. भाजीपाला, पिकांसह उन्हाळी हंगामातील पिकांनाही फटका बसत आहे.

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात गारपीटीसह जोरदार पाऊस पडला. पावसामुळे शेतातील कांदा, द्राक्ष, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. भाजीपाला, पिकांसह उन्हाळी हंगामातील पिकांनाही फटका बसत आहे. 

गेल्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. रविवारी (ता.2) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, भोर, मावळ, मुळशी, वेल्हे, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यात जोरदार वादळी गारांचा पाऊस पडला. भोर (जि. पुणे) तालुक्यातील चेलाडी येथे (रविवार) दुपारी तीन वाजता अंगावर वीज कोसळून दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. साताऱ्यातही काही भागांत जोरदार पाऊस झाला. तर दोन जणांचा विजपडून मृत्यू झाला.

नाशिकमधील इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जवळपास एक तास गारपीट झाली. नगर जिल्ह्यातही नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर भागात, संगमनेर,शिर्डी भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडल्या. सोलापूर जिल्ह्यात बार्शी, सोलापूर शहर परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. मराठवाड्यातही परभणी शहर व तालुक्यातील अनेक भागात ढगांच्या गडगडाटात हलका पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय परिसरात दोन जणांना मृत्यू झाला. विदर्भातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. 

आंब्याचे नुकसान 
कोकणातही मुरबाड (ठाणे) तालुक्यातील आल्याची वाडी मोधळवाडी येथे गारपीटीसह वादळी पाऊस झाला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही अंशी ढगाळ तर अधूनमधून ऊन पडत होते. यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. फळांची मोठी गळ होत आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...