agriculture news in Marathi rain in Ankushnagar area Maharashtra | Agrowon

अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका 

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

एकिकडे कोरोनाचे सावट असताना पुर्वमोसमी पावसाचा दणका शेतकरी वर्गाला चांगलाच बसला आहे.

अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट असताना पुर्वमोसमी पावसाचा दणका शेतकरी वर्गाला चांगलाच बसला आहे. शनिवारी (ता. २८) अंकुशनगर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.
 
परिसरात मार्च महिन्यात चार वेळेस पावसाचा फटका बसला असून यामध्ये गहू हरभरा, ज्वारी रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याच बरोबर फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय गहू काढणीला मजूर मिळेना, काढून ठेवलेल्या गव्हाला मळणी यंत्र व हार्वेस्टर मिळत नसल्याने गहू तसाच उघड्यावर भिजत पडला आहे.

या महिन्यात वडीगोद्री येथे दोन वेळस अवकाळी पावसामुळे आलेल्या टरबूजाला ही मोठ्या प्रमाणात  फटका बसला आहे. कांदा पिकांचेही नुकसान झाले आहे. 

अनेक शेतकऱ्यांनी घरात भाव वाढीच्या आशेने कापूस घरात साठवून ठेवला आहे. त्याला व्यापारी मिळेना व भाव ही नाही त्यात महसूल विभाग हे कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यात व्यस्त असतांना पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होतील का नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...