agriculture news in Marathi rain in Aurangabad and Jalna district Maharashtra | Agrowon

औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस 

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

अवकाळी पावसाने काही ठिकाणी वादळ तर काही ठिकाणी गारपीटसह पावसाने हजेरी लावली. 

औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७ मंडळात शनिवार (ता २८) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात अवकाळी पावसाने काही ठिकाणी वादळ तर काही ठिकाणी गारपीटसह पावसाने हजेरी लावली. 

गत काही दिवसापासून मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. शुक्रवारी (ता २७) दुपारनंतर बदललेल्या वातावरणाने सायंकाळी पुर्वमोसमी पावसाच्या रुपात औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील अनुक्रमे ३९ व २८ मंडळात हजेरी लावली.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाऊस झालेल्या ३९ मंडळात औरंगाबाद तालुक्यात येत असलेल्या आठ मंडळांसह पैठणमधील सात, गंगापूर मधील नऊ, वैजापुर, कन्नड, खुलताबाद प्रत्येकी दोन सिल्लोड मधील चार, सोयगाव मधील दोन व फुलंब्री तालुक्यातील तीन मंडळात कमी-अधिक प्रमाणात वादळासह अवकाळी पाऊस झाला. 

गंगापुर तालुक्यातील गंगापूर मंडळात सर्वाधिक ४१ मिलिमीटर तर त्यापाठोपाठ याचं तालुक्यातील वाळुज मंडळात २४.५० मिलिमीटर, फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री मंडळात २०.२५ मिलिमीटर तर औरंगाबाद तालुक्यातील कांचनवाडी मंडळात १४.२५ मिलिमीटर, भावसिंगपुरा मंडळात २९.३० मिलिमीटर तर औरंगाबाद मंडळात १२.२५ मिलिमीटर पावसाची नोंद घेतली गेली. इतर मंडळात०.२५ ते ७ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद घेतली गेली. जिल्ह्यात सरासरी ३.९६ मिलिमीटर पाऊस झाला. काही ठिकाणी वादळामुळे घरावरील टिनपत्रेही उडून गेल्याची घटना घडली. 

जालना जिल्ह्यातही अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात जालना जिल्ह्यातील २८ मंडळात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सहा, जाफराबाद तालुक्यातील चार, जालना तालुक्यातील ५, अंबड तालुक्यातील पाच, बदनापूर तालुक्यातील तीन, घनसावंगी व परतूर तालुक्यातील प्रत्येकी एक तर मंठा तालुक्यातील तीन मंडळात अवकाळी पाऊस झाला. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...