Agriculture news in Marathi Rain barrier during sugarcane harvesting season | Agrowon

ऊस तोडणी हंगामात पावसाचा अडथळा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

शासनाने गुरुवार (ता. १५) पासून ऊस हंगाम सुरू होईल, असे सांगितले असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणी सुरू झाली नाही. जोरदार पावसामुळे ऊस तोडणी यंत्रणा  ठप्प असल्याचे चित्र अनेक ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये होते.

कोल्हापूर : शासनाने गुरुवार (ता. १५) पासून ऊस हंगाम सुरू होईल, असे सांगितले असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणी सुरू झाली नाही. जोरदार पावसामुळे ऊस तोडणी यंत्रणा  ठप्प असल्याचे चित्र अनेक ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये होते.

सातत्यपूर्ण पावसामुळे हंगाम आणखी पंधरा दिवस लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काही कारखान्यांनी १५ ऑक्टोबरपासून ऊस तोडणी सुरू करण्याचे नियोजन केले होते. गेल्या चार दिवसांपासून बहुतांश ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस असल्याने कारखान्यांना ऊस तोडणीच्या हालचाली करणे अशक्य बनले आहे.

जिथे कामगार आले आहेत त्याच ठिकाणी थांबून राहिल्याने संपूर्ण तोडणी यंत्रणा ठप्प झाली आहे. जोपर्यंत पूर्ण पाऊस थांबून पडत नाही तोपर्यंत तोडणी अशक्य असल्याचे साखर कारखाना सूत्रांनी सांगितले. ऊस तोडणीचे नियोजन करणारे प्रयत्नात असणाऱ्या साखर कारखान्यांना
हंगामाचा पहिला दिवसच भरपावसात काढावा लागला.

हंगामाचा प्रारंभ लांबणार
जोरदार पावसामुळे ऐन हंगामातच अनिश्चित काळासाठी ऊस तोडणी ठप्प होण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच घडल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. ऊस तोडणीच्या प्लॉटला पूर्णपणे तळ्याचे स्वरूप आल्याने पाऊस थांबल्यानंतर किमान आठवड्याहून अधिक काळ तोडणीसाठी थांबावे लागणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...
चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’...बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते...
नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...