जोर ओसरला; उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज

हवामान अंदाज
हवामान अंदाज

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून जवळपास दोन आठवडे सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पावसाने जोर धरल्याने या राज्यांना लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता. १२) उत्तर कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि जळगावसह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  मध्य भारतात असल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे, तर मॉन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला असल्याने मध्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या उत्तर भागात ढगांची दाटी झाली असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यत: कोरडे हवामान आहे. तुरळक ठिकाणी एखादी सर शिडकावा करत आहे. पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला असून, नद्याची पाणीपातळी कमी होत आहे.   बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : डहाणू ७६, जव्हार ५५, मोखेडा ४१, पालघर ९८, तलासरी ४५, विक्रमगड १११, खालापूर ४२, माथेरान ४१, म्हसळा ३०, पेण ५०, श्रीवर्धन ४०, खेड ३२, मंडणगड ३०, दोडामार्ग ४०, मालवण ८०. मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ५४, महाबळेश्वर ३७. विदर्भ : मोहाडी ५९, गोंदिया ४३, मौदा ५७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com