agriculture news in Marathi, rain became weak in state, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

जोर ओसरला; उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून जवळपास दोन आठवडे सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पावसाने जोर धरल्याने या राज्यांना लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता. १२) उत्तर कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि जळगावसह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून जवळपास दोन आठवडे सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पावसाने जोर धरल्याने या राज्यांना लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज (ता. १२) उत्तर कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि जळगावसह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मध्य भारतात असल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे, तर मॉन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला असल्याने मध्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या उत्तर भागात ढगांची दाटी झाली असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यत: कोरडे हवामान आहे. तुरळक ठिकाणी एखादी सर शिडकावा करत आहे. पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला असून, नद्याची पाणीपातळी कमी होत आहे.  

बुधवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : डहाणू ७६, जव्हार ५५, मोखेडा ४१, पालघर ९८, तलासरी ४५, विक्रमगड १११, खालापूर ४२, माथेरान ४१, म्हसळा ३०, पेण ५०, श्रीवर्धन ४०, खेड ३२, मंडणगड ३०, दोडामार्ग ४०, मालवण ८०.
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ५४, महाबळेश्वर ३७.
विदर्भ : मोहाडी ५९, गोंदिया ४३, मौदा ५७.


इतर बातम्या
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
विधान परिषद निवडणूक पुढे ढकलल्याने...मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
पुणे बाजार समितीत १८ हजार क्विंटल...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
खटाव तालुक्यातील बागांमध्ये निर्यातक्षम...कलेढोण, जि. सातारा  : ‘कोरोना’च्या...
पुणे जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांच्या ...पुणे  ः गत आठवड्यात पुणे जिल्ह्यातील काही...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
घराला भरभराट देणारी फळे जागेवरच गळून...नगर ः ‘‘यंदा पहिल्यांदाच गावांत अनेक...
परीक्षा रद्द होणार नाहीत, विद्यापीठ,...मुंबई ः राज्यातील कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव...
पंतप्रधान, खासदारांच्या वेतन कपात;...नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील संघर्षासाठी...
पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाने हादरला मुंबई  ः पालघर जिल्हा रविवारी (ता.५) रात्री...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...