agriculture news in Marathi, Rain becoming weak, Maharashtra | Agrowon

पावसाचा जोर ओसरला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पुणे : राज्याच्या काही भागात दाणादाण उडवून देणारा पाऊस आेसरण्याचा अंदाज आहे. आजपासून (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्रात सकाळपासून उन्हाचा चटका, उकाडा, तर दुपारनंतर ढग जमा होऊन मेघगर्जना विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदूबार, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे : राज्याच्या काही भागात दाणादाण उडवून देणारा पाऊस आेसरण्याचा अंदाज आहे. आजपासून (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्रात सकाळपासून उन्हाचा चटका, उकाडा, तर दुपारनंतर ढग जमा होऊन मेघगर्जना विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदूबार, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

मॉन्सूनचा आस निवळून गेला असला तरी अद्याप संपूर्ण देशात मॉन्सूनचे अस्तित्व आहे. मॉन्सून सक्रिय असल्याने दोन-तीन दिवस पावसाचा जोर वाढला. पुण्यासह, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, वाशीम मध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाने दणका दिल्याने पूरस्थिती निर्माण झाली. धरण क्षेत्रातील पावसामुळे अनेक धरणांतून विसर्ग सुरू करावा लागला.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभर मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली होती.   

उत्तर अरबी समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे आज (ता. २८) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे आणि त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्रणाली पूरक ठरल्याने पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रात मात्र दोन-तीन दिवस पाऊस कमी होणार असून, दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) :
कोकण : कुलाबा ५१, जव्हार ३९, मोखेडा ३५, अलिबाग ६२, खालापूर ६६, माणगाव ५०, मुरूड १४०, श्रीवर्धन ६५, सुधागडपाली ७६, उरण ६१, लांजा ३७, राजापूर ४४, संगमेश्वर ३५, देवगड ५७, दोडामार्ग ३३, सावंतवाडी ४६, वैभववाडी ३३, कल्याण ३५.
मध्य महाराष्ट्र : अंमळनेर ३२, भुसावळ ३०, यावल ३२, चंदगड ३३, चंदगड ३७, दिंडोरी ३३, इगतपुरी ६०, नाशिक ३३, पेठ ४४, सुरगाणा ३२, जुन्नर ४३, मंगळवेढा ३८.
मराठवाडा : गंगापूर ३२, कन्नड २९, कळमनुरी २६, रेणापूर ४०, भोकर ४२, हादगाव २९, हिमायतनगर ३८, मुखेड ३०, नायगाव खैरगाव ४२, नांदेड ४४, उमरी २६, पूर्णा ४४.
विदर्भ : बटकुली ३२, दर्यापूर ३०, नांदगाव काझी २४, परतवाडा २७, खारंघा २१, मनोरा २५, पुसद २२.  


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...