Agriculture news in Marathi, Rain breaks down farmers in Khad-Patan | Agrowon

पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा मोडला कणा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी झालेली पिकेही वाया गेली असल्याने शेतकरी हवादिल झाले आहेत. पावसामुळे ओढ्या-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडून जवळच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले. ढगफुटीसारख्या कोसळलेल्या पावसामुळे कऱ्हाड-चिपळूण महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. 

कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी झालेली पिकेही वाया गेली असल्याने शेतकरी हवादिल झाले आहेत. पावसामुळे ओढ्या-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडून जवळच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले. ढगफुटीसारख्या कोसळलेल्या पावसामुळे कऱ्हाड-चिपळूण महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. 

शेतकऱ्यांनी खरीप पिके मोठ्या धाडसाने घेतली होती. त्यावर मध्यंतरी महापुराचे पाणी फिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यातून तावून सुलाखून निघालेल्या पिकांनी आत्ता कुठे जोर धरला. तोच पुन्हा परतीच्या पावसाने थैमान घातले असून उर्वरित पिकेही आता वाया जाण्याच्य मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी काढणीस आलेले सोयाबीन वाया गेले आहे, तर जे काढलेले आहे त्याला कोंब फुटू लागले आहेत. तीच स्थिती भुईमुगाचीही झाली आहे.

डोळ्यादेखत पिके वाया जात असल्याने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी काळात पडलेल्या पावसापेक्षा रविवारचा विक्रमी पाऊस पडला. सकाळी सातच्या सुमारास संततधार पावसास सुरुवात झाली. हळूहळू पावसाचे प्रमाण वाढू लागले. सकाळी नऊ वाजल्यानंतर तर मुसळधार पावसाने कहर केला. डोंगर पठारावरील पाणी ओढे-नाले भरून वाहू लागले. काही ठिकाणी ओढ्यांनी पात्र बदलले. 

ओढ्या-नाल्याच्या पात्रातून पाणी शेतात पसरायला लागले. दोन दिवसांपूर्वी कापणी केलेली भात व सोयाबीन पिके तशीच शेतात पडून होती. आजच्या पावसाने कापणी केलेल्या पिकाची पूर्ण वाट लावली. उभी पिके भुईसपाट झाली. सगळीकडे पाणीच पाणी झाले. अतिवृष्टीत वाचलेल्या पिकांवर परतीच्या पावसाने अस्मानी संकट आणले आहे.

इतर बातम्या
शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायममुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे...
संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम...नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...