agriculture news in marathi Rain to cereal crops Wait; Farmers worried | Agrowon

कडधान्य पिकांना पावसाची प्रतीक्षा; शेतकरी चिंतेत

गुरुवार, 10 जून 2021

जळगाव :  खानदेशात काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यावर अनेक शेतकऱ्यांनी जोखीम घेत कडधान्य पिकांची पेरणी केली. परंतु, त्यावर चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

जळगाव :  खानदेशात काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यावर अनेक शेतकऱ्यांनी जोखीम घेत कडधान्य पिकांची पेरणी केली. परंतु, त्यावर चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

राज्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्याचेही गेले दोन दिवस तज्ज्ञ, विविध संस्था सांगत आहेत. यामुळे पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. परंतु पाऊस गेले तीन दिवस हुलकावणी देत आहे. सकाळी पावसाळी वातावरण असते, दुपारी ऊन पडते आणि सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण, काही भागात विजांचा चमचमाट, अशी स्थिती असते. महागडे बियाणे शेतकऱ्यांनी पेरलेले नाही.

सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी या पिकांना किमान ३० ते ३५ मिलिमीटर पावसाची गरज असते. पेरणीनंतरही पाऊस हवा असतो. सोयाबीन, कापूस, ज्वारीचे बियाणे महाग आहे. यामुळे त्याची पेरणी शेतकऱ्यांनी टाळली आहे. 

कडधान्यवर्गीय पिकांत तूर, उडीद व मुगाची पेरणी शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात केली. ही पेरणी धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, शहादा, जळगावमधील पाचोरा, अमळनेर, एरंडोल, चोपडा आदी भागात झाली आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीकाठी पेरणी शेतकऱ्यांनी केली. अनेकांनी घरात साठविलेले उडीद, मूग व तुरीचे बियाणे पेरले आहे. पण पाऊस हवा तसा नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

पेरणीची टक्केवारी अत्यल्प 

पाऊस पडत आहे, पण फक्त काही भागातच त्याचे आगमन होत आहे. सर्वत्र पाऊस नाही. जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, बोदवड भागात पाऊस आलेलाच नाही. फक्त यावल, जळगाव, रावेर, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल आदी भागात गेल्या आठवड्यात पाऊस झाला. पेरणीची टक्केवारी अत्यल्प आहे. त्याची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. पण पेरणीसाठी पूर्वमशागती झाल्या आहेत. शेतकरी मोसमी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

टॅग्स

इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...