agriculture news in marathi, rain continue in akola, maharashtra | Agrowon

अकोला जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर पाऊस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 जुलै 2018

अकोला : मागील दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असून, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्हाभरात पावसाची नोंद झाली अाहे. मंगळवारी (ता. १०) सकाळपासून ढगाळ हवामान होते. अधून-मधून पावसाच्या सरी बरसत होत्या.

अकोला : मागील दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असून, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्हाभरात पावसाची नोंद झाली अाहे. मंगळवारी (ता. १०) सकाळपासून ढगाळ हवामान होते. अधून-मधून पावसाच्या सरी बरसत होत्या.

गत दोन दिवसांपासून वऱ्हाडात बऱ्यापैकी पाऊस होत अाहे. प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात सर्वदूर पाऊस अाहे. त्यात सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यात अधिक जोर अाहे. या तालुक्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक ३१.४ मिमी पाऊस नोंदविला गेला. मूर्तिजापूरमध्येही पावसाचा जोर टिकून अाहे. येथे २२.१ मिमी पाऊस झाला. अकोल्याप्रमाणेच वाशीम जिल्ह्यात पावसाचा जोर कायम अाहे. मंगळवारी सकाळी वाशीम जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पावसाची नोंद झाली. कारंजा तालुक्यात सर्वाधिक २५.२५ मिमी पावसाची नोंद झाली.

बुलडाणा जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात शेगाव येथे सर्वाधिक २०.८ मिमी तर नांदुरा, संग्रामपूर या तालुक्यांत १३.२ मिमी पाऊस झाला. घाटावर देऊळगावराजा, सिंदखेडराजा, बुलडाणा, लोणार, मेहकर, चिखली या तालुक्यांमध्ये अत्यंत तुरळक स्वरूपात पाऊस झाला.

वऱ्हाडातील तालुकानिहाय पाऊस (मिमी) -

  • अकोला जिल्हा ः अकोला १५.३, बार्शीटाकळी १४.८, अकोट ३१.४, तेल्हारा ८.३, बाळापूर १९, पातूर ७.२, मूर्तिजापूर २२.१. जिल्हा सरासरी १६.९.
  • बुलडाणा जिल्हा ः बुलडाणा ०.७, चिखली २.७, देऊळगावराजा ०, सिंदखेडराजा ०.२, लोणार ०, मेहकर २.०, खामगाव ११.५, शेगाव २०.८, मलकापूर ५.२, नांदुरा १३.२, मोताळा २.९, संग्रामपूर १३.२, जळगाव ११.० जिल्हा सरासरी ६.४.  
  • वाशीम जिल्हा  ः वाशीम ५.१७, मालेगाव ७.६८, रिसोड १.३८, मंगरुळपीर १८.८९, मानोरा १३.२२, कारंजा २५.२५ जिल्हा सरासरी १२.०६.

इतर बातम्या
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
सप्टेंबरमधील पावसामुळे प्रकल्पांना...अकोला  : गेल्यावर्षात अत्यल्प पावसामुळे...
पिंपळनेर बाजार समितीत कांद्याला ३१०० ते...पिंपळनेर, जि. धुळे  ः साक्री कृषी उत्पन्न...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
शेतीत सुधारित तंत्राने शाश्‍वत उत्पन्न...सोलापूर ः शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञान...
येत्या निवडणुकीत जनता पुन्हा आम्हाला...कोल्हापूर ः सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊन...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
पुणे ः दूध उत्पादकांना लिटरला एक रूपया...पुणे ः जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...