agriculture news in Marathi rain continue in Marathwada Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात पावसाचा जोर कायम

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक भागात हलक्या सरी पडत आहे.

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे अनेक भागात हलक्या सरी पडत आहे. मात्र, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाचा जोर कायम असून मुखेड येथे सर्वाधिक १३३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.  

राज्यातील बहुतांशी भागात पावसासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे चांगलाच पाऊस बरसत आहे. कोकणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. पनवेल येथे १११.६ मिलिमीटर पाऊस पडला असून इतर भागात चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी सततच्या पावसामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

मध्य महाराष्ट्रात मागील तीन ते चार दिवसापासून ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत आहे. दुपारी ऊन रात्री हलक्या सरी पडत असल्याची स्थिती आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी बाजरी सोंगणीची कामे सुरू आहे. मात्र, इगतपुरी, चांदवड व येवला तालुक्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. घाटमाथ्यावर पावसाच्या तुरळक सरी पडल्या असून सोलापूर, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात शेती कामे वेगाने सुरू आहेत.  

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाच्या काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. देवणी येथे १११ मिलिमीटर पाऊस पडला असून चाकूर, वैजापूर, हिमायतनगर, रेणापूर, बदनापूर, जळकोट, पालम, बिलोली, देगलूर येथे जोरदार पाऊस पडला. त्यामुळे या परिसरात अति पावसामुळे शेतामध्ये चांगलेच पाणी साचल्याने ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते.

पश्चिम विदर्भात पाऊस नसला तरी पूर्व भागात चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या असून तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. या पिकांमुळे कापूस, तूर पिकांना दिलासा मिळाला असला तरी इतर पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. 

बुधवारी (ता.१६) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग)
कोकण : मुरूड ४५, हर्णे ३४.४, देवगड ५४, मालवण ५६, ठाणे २९.
मध्य महाराष्ट्र : चंदगड २९.४, खंडाळा २५.३.
मराठवाडा : वैजापूर ६५, बदनापूर ६४, जालना ४२, चाकूर ७४, जळकोट ५१, रेणापूर ५०, बिलोली ७०, देगलूर ५४, हिमायतनगर ६१, नायगाव खैरगाव ४०, पालम ४३.
विदर्भ : कोर्पणा ३८.३, अहेरी ४४.८, धानोरा २७.७, देवळी २७.१, घाटंजी २७.६.


इतर अॅग्रो विशेष
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...