ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
ताज्या घडामोडी
महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई तालुक्यात पावसाचा जोर कायम
सातारा : जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. इतर सर्व तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मंगळवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई या तालुक्यांत पावसाचा जोर कायम आहे. या तालुक्यांत अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. या तालुक्यात भर पावसात भात लागवडीचे काम वेगात सुरू आहे; तसेच सातारा व कराड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.

माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. या धरण क्षेत्रातील कोयना येथे ९५, नवजा येथे ९६ व महाबळेश्वर येथे ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात एकूण ४६.६२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात गत २४ तासांत २.९१ टीएमीसीने वाढ झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिमी) ः सातारा ५.९, जावली १८.८, पाटण २०.५, कराड २.५, कोरेगाव २, खटाव १.२ , माण ०.१, फलटण १.७, खंडाळा ९.१, वाई ११.७, महाबळेश्वर १००.७.
- 1 of 1026
- ››