सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

पावसाचा जोर कायम
पावसाचा जोर कायम

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत एकूण सरासरी ५७.०४ मिलिमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कमी होत नसल्याने कोयना, कृष्णा, तारळी, उरमोडी आदी नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. अनेक गावांत पूर आला असून कुटुंबांचे स्थलांतर केले जात आहे. महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने कोयना धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पश्चिमेकडील सातारा, कराड, जावली, वाई, कोरेगाव या तालुक्यांतील पावसाचा जोर वाढत असल्याने पिके पाण्याखालीच आहेत.

कोयना धरणक्षेत्रातील कोयना येथे ३०४, नवजा येथे ३२५, महाबळेश्वर येथे २८३ मिलिमीटर पाऊस मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झाला होता. कोयना धरणाची पाणीपातळी २१६०.०५ फूट झाली असून १०१.२५३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात मंगळवारी दुपारी अडीच वाजता १०२ टीएमसी म्हणजेच ९६.९१ टक्के पाणीसाठा झाला. सध्या एक लाख ४२ हजार ८३२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणातून एक लाख १० हजार ९७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच धोममधून १९, ८७४, धोम बलकवडीमधून ४,३८५, कण्हेरमधून १३,५१८, उरमोडीमधून ९३९८, तारळी धरणातून ८९५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर) ः सातारा ८१.५८, जावळी १०२.७०, पाटण ९१.५५, कराड ७४.३८, कोरेगाव २३.११, खटाव  १८.७६ , माण २.५७, फलटण ४.३३, खंडाळा २३.७०, वाई ३६.३४, महाबळेश्वर २०९.६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com