agriculture news in Marathi rain continue in state Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाची रिपरिप सुरुच 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून मराठवाडा व विदर्भातही पावसाने जोर धरला आहे. गुरूवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत रायगडमधील भिरा येथे सर्वाधिक १९९ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 

पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून मराठवाडा व विदर्भातही पावसाने जोर धरला आहे. गुरूवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत रायगडमधील भिरा येथे सर्वाधिक १९९ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत झाली आहे. 

कोकणातील काही तालुक्यांत मुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवारी सकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यातील दोडामार्ग आणि कणकवलीच्या पूर्वेकडील भागात मुसळधार पाऊस झाला. तर सांवतवाडी, कुडाळ, वैभववाडी या तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.

दोडामार्ग तालुक्यात सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तिलारी नदीच्या पाणीपातळीत अजुनही तितकीशी घट झालेली नाही. रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. पाऊस ओसरल्यामुळे कोकणातील बहुतांशी नदीच्या पातळीत स्थिरता आहे. 

मध्य महाराष्ट्रात संततधार 
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगर या जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यातील धरणक्षेत्रात पावसाचा बऱ्यापैकी जोर होता. पूर्व पट्ट्यात हलक्या सरी कोसळत होत्या. पुणे जिल्ह्यातील धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. खडकवासला, कळमोडी आणि वीर या तीन धरणांतून पाण्याचा विसर्ग मुळा व भिमा, निरा नदीत सोडण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ मंदावली आहे.

जिल्ह्यातील २५ बंधारे अद्याप ही पाण्याखाली होते. सातारा व सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. नगरमधील अकोले तालुक्यात पावसाच्या संततधारेमुळे मुळा, भंडारदरा, निळवंडे या धरणातील पाणीपातळी वाढ होत आहे. नाशिकमधील गंगापूर धरणात पाणीपातळीत वाढ, तर दारणा, भावली धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. 

खानदेशात हलका पाऊस 
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील अनेक भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असून, सातपुड्यातील उदय नदीला चांगले प्रवाही पाणी आले आहे. तळोदा भागातून जाणाऱ्या खरडी नदीलाही चांगले प्रवाही पाणी आहे. तर सातपुड्यातून येणारी सुसरी, गोमाई नदीदेखील प्रवाही आहे. सातपुडा पर्वतातील यावलमधील मनुदेवी येथील धबधबा प्रवाही झाला आहे. तर चाळीसगावमधील पाटणादेवी भागातील धवलतीर्थ धबधबादेखील प्रवाही आहे 

मराठवाड्यातही हजेरी 
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. वाढीच्या परिपक्वतेच्या अवस्थेतील खरीप पिकांसाठी रिमझिम पाऊस पोषक ठरत आहे. परंतु सुरुवातीपासून कमी पाऊस झालेल्या मंडळांतील विहिरींच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत अजूनही फारशी वाढ झालेली नाही. 

वऱ्हाडात रिमझिम 
वऱ्हाडासह पूर्व विदर्भात रिमझिम पाऊस होत आहे. पूर्व विदर्भात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक प्रकल्पांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वर्धा, मांडू, पाक, जाम या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भंडारा जिल्ह्यातील चुलबंद कार्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही तलाव, बोडी व नद्यांमध्ये जलसाठा वाढल्याने धान पट्ट्यात रोवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. वर्धा, गडचिरोली गोंदिया अमरावती यवतमाळ, अकोला या जिल्ह्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. 

राज्यात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे 
भिरा १९९, जव्हार १२२, तलासरी ११९, विक्रमगड ११०, कर्जत १०९.२, माथेरान १६१.४, ठाणे १०१, उल्हासनगर १०२,नवापूर १४०, इगतपुरी १४५, लोणावळा कृषी १५१, 

गुरूवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः 
कोकण : सांताक्रुझ ४२, डहाणू ९०.१, मोखेडा ९६, पालघर ५६.८, वसई ९०, वाडा ८७, अलिबाग ३३.८, खालापूर ९८, महाड ४०, माणगाव ४०, म्हसळा ६९, मुरूड ५०, पनवेल ५८, पेण ६०, पोलादपूर ८०, रोहा ७१, श्रीवर्धन ३७, सुधागडपाली ९९, तळा ९८, उरण ३९, चिपळूण ९०, खेड ६०, लांजा ३४, मंडणगड ६७, दोडामार्ग ६८, कणकवली ४४, आंबरनाथ ९०, भिवंडी ८५, कल्याण १३२, मुरबाड ६५, शहापूर ६८. 
मध्य महाराष्ट्र : बोधवड २३, दहीगाव ३०.२, एरंडोल ३६, जळगाव २५.५, जामनेर ३१, मुक्ताईनगर २५, पारोळा ३२, यावल २८, चंदगड ३३, पन्हाळा ३२, राधानगरी ९५, शाहूवाडी २८, अक्कलकुवा ३५, अक्रणी ३६, तळोदा २२, हर्सूल ५९.६, ओझरखेडा ९३, पेठ ७७, सुरगाणा ६३.१, त्र्यंबकेश्वर ६६, पौड ५२, वडगाव मावळ ३२, वेल्हे ९४, जावळीमेढा २७.२, महाबळेश्वर १३५.५. 
मराठवाडा : भोकर ३३, किनवट २९, माहूर २९, परभणी २०. 
विदर्भ : लाखंदूर ४८.२, पवनी ६२.४, तुमसर ३३.२, ब्रह्मपुरी ३३.८, चिमूर ३७, नागभिड ४७.२, अरमोरी ३१.७, देसाईगंज वडसा ३४.३, गडचिरोली ३३.३, कोर्ची ४८.७, कुरखेडा ७९,आमगाव ४५.८, अर्जुनीमोरगाव ३४.४, देवरी ३०.७, गोरेगाव ३३.३, तिरोडा ३६.८, भिवापूर ५३.३, नागपूर ३०.५, उमरेड ४६.१, वणी ३३ 


इतर अॅग्रो विशेष
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...