agriculture news in Marathi rain continue in state Maharashtra | Agrowon

पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

ज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता.२०) सर्वदूर जोरदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला. शेतांमध्ये पाणी साचून काढणीला आलेली पिके पाण्याखाली जात आहेत.

पुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता.२०) सर्वदूर जोरदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला. शेतांमध्ये पाणी साचून काढणीला आलेली पिके पाण्याखाली जात आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, बीड जिल्ह्यांतील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ऐन पिके काढणीच्या काळात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळे, नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  
 

मराठवाड्यात सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आधी मूग आता उडीद सोयाबीन व कपाशी आदी पिके संकटात सापडली असून कुठे कपाशीची बोंड काळी पडली तर कुठे उडीद, सोयाबीनला मोड आले. अनेक शेतशिवारात पाणी साचले. जालना जिल्ह्यातील ६ औरंगाबाद व बीड मधील प्रत्येकी एक मिळून ८ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

अमरापूरवाघुडी (ता. पैठण) येथील अजय पोलसने यांच्या शेतातील कांदा पिकांत पाणी साचल्याने नुकसान होऊ लागले आहे. जालना जिल्ह्यातील राजणी ते विरेगाव मार्गावर दुधना नदीला आलेला पूर आला. तर शेवगळ ता घनसावंगी परिसरात सोयाबीनच्या शेतामध्ये असे पाणी साचले होते. नांदेडमधील गवतवाडी (ता.हदगाव) शिवारात पावसामुळे ओढ्याला पूर येऊन कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परभणीतील चाटेपिंपळगाव (ता. पाथरी) चाटे पिंपळगाव सततच्या पावसामुळे पाणी साचून राहिल्याने सोयाबीनचे वादळामुळे, वारे पावसामुळे ऊस आडवा होऊन नुकसान झाले.

कोकणात मुसळधार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस होता. निसवण्याच्या स्थितीत असलेले भात पीक अनेक ठिकाणी धोक्यात येणार आहे. वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडीत धुव्वाधार पाऊस पडला. जास्त फटका भात पिकाला बसण्याची भिती आहे. तसेच सुपारी व इतर पिकेही बुरशीजन्य रोगाच्या चक्रात अडकण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्रात दाणादाण
पुणे जिल्ह्यात अनेक भागांत बाजरीची काढणी अंतिम टप्प्यात होती. जवळपास ७५ टक्के बाजरी पिकाची काढणी झाली आहे, परंतु उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ऊस, बाजरी, मका पिकाचे नुकसान झाले आहे. नाशिकमधील कळमदरे येथे कांदा लागवडीत पाणी साचून राहिल्याने लागवडी धोक्यात आल्या आहेत. कळवणमध्ये अमोल मुर्तडक यांची विहिरीचा कडा कोसळला. सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात हिळीनजिक पाण्याने बंधारे भरून वाहत आहे. उत्तर सोलापुरात नव्याने लागणी झालेल्या कांद्याची रोपे सडू लागली आहेत. तर पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यात ऊस आडवा झाला आहे.

विदर्भात कमी, अधिक जोर
विदर्भातील अनेक भागात कमीअधिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोला, अमरावती जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात वादळ व पावसामुळे मोताळा तालुक्यात टाकळी शिवारात प्रल्हाद सपकाळ यांच्या शेतातील मका जमीनदोस्त झाली. चंद्रपूर, नागपूर, वर्धा,  वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाच्या रोज अधूनमधून सरी बरसत आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणीला आले असताना पावसामुळे काढणीआधीच कोंब येत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.  
 
रविवारी (ता.२०) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः (स्त्रोत, हवामान विभाग)
कोकण :  भिरा ५७, श्रीवर्धन ८८, चिपळूण ५२, खेड २९, रत्नागिरी ३६, संगमेश्वर ६८, दोडामार्ग ८१, मालवण ४०, सावंतवाडी ८३, वैभववाडी ४५, वेंगुर्ला १०९.
मध्य महाराष्ट्र ः शिरपूर ३६, आजरा ५६, राजगुरूनगर ४१.
मराठवाडा : गेवराई ६०, घनसांगवी ६२, जालना ४२, अर्धापूर ४६, लोहा ३७, नांदेड ५७, लोहारा ४१, तुळजापूर ३५. 
विदर्भ : लोणार ३३.२, मेहकर ४२.२, संग्रामपूर ५५.३, सिंदखेड राजा ६९.६, भामरागड ४३.७, कुही २४.९, नागपूर ४५.४, मालेगाव ७८.१

पावसाचा तडाखा

  • राज्यात सर्वदूर पावसाचा जोर
  • कोकणात भात काढणी प्रभावित
  • सोलापूर जिल्ह्यात ऊस पिकाला फटका
  • नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी टोमॅटो पीक जमीनदोस्त
  • मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, तूर,  मका, कापूस, हळदीला मोठा फटका
  • खानदेशात केळी, ऊस, मका पीक प्रभावित
  • नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
     

इतर अॅग्रो विशेष
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...
द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन...नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड...
हातचं सारं गेलं, आता जगावं कसं?नाशिक : यंदा वेळेवर पाऊस नसल्याने भाताची रोपे...
धानाच्या हमीभावात ११ वर्षांत केवळ एक...भंडारा: व्यवस्थापन खर्चात दरवर्षी होणारी वाढ,...
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली पुणे ः राज्यातील अनेक भागात उन्हाची तीव्रता वाढली...
कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेशनाशिक : जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये...
सर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला...गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती,...
कृषी उद्योजकतेची ‘एबीसी’सन २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी ...
आयकर भरणाऱ्या ६५१ शेतकऱ्यांना नोटिसाशहादा, जि. नंदुरबार : आयकर भरत असूनही केंद्र...
कांद्याची कोट्यवधीची उलाढाल ठप्प नाशिक: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या दरावर...
करार शेतीची जबाबदारी कृषी विभागाकडेचपुणे: करारशेतीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर...
मॉन्सूनने घेतला देशातून निरोपपुणे ः परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी...