मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमी

औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी केवळ ८.२ मिलिमिटर पाऊस झाला. पावसाचा जोर कमी झाला.
Rain continues in Marathwada; Less emphasis
Rain continues in Marathwada; Less emphasis

औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत सरासरी केवळ ८.२ मिलिमिटर पाऊस झाला. पावसाचा जोर कमी झाला. मात्र नांदेड जिल्ह्यातील भोकर, मुदखेड, अर्धापूर, उमरी आदी तालुक्‍यात सरासरी ३० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. हिंगोलीतील औंढा तालुक्‍यात सरासरी ३३.२ मिलिमीटर पाऊस झाला. 

नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्‍यात सरासरी २२.५ मिलिमिटर, बिलोली २१.८, मुखेड १०, कंधार १६.४, लोहा १०.८, हदगाव १३.८, भोकर ४३.६, किनवट १९.५, मुदखेड ३३.४, हिमायतनगर २२.१, माहूर २१.४, धर्माबाद २१, उमरी ३३.४, तर अर्धापूर तालुक्‍यात सरासरी ४१.५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. इतर तालुक्‍यात सरासरी ४.९ ते १३.८ मिलिमिटर पाऊस झाला. 

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्‍यात सरासरी २२.३ मि.मी, कळमनुरी ११.१, वसमत १७.७, औंढा ३३.२ मि.मी झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यात तुरळक पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात ०.४ ते ६ मि.मी दरम्यान पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी २२.६ मि.मी पाऊस झाला. इतर सर्व तालुक्‍यात सरासरी ३.३ ते ८.१ मि.मी पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी २७.८ मि.मी पाऊस झाला. त्यापाठोपाठ जालना तालुक्‍यात सरासरी १४.६ मि.मी, तर इतर सर्व तालुक्यांत सरासरी ०.८ ते ९.५ मिलिमिटर पाऊस झाला. 

  वीरभद्रा नदीला पूर 

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यात सरासरी १४.२ मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्‍यातील दावरवाडी, विहामांडवा, ढोरकीन परिसरात शुक्रवारी (ता.२२) दुपारी दमदार ते जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वीरभद्रा नदीला पूर आला. इतर तालुक्‍यात पावसाची हजेरी तुरळक ते हलकी राहिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com