Agriculture news in marathi, Rain continues in Marathwada; Soybeans, cotton crop damaged | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी पिकाला दणका

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात जोर कायम आहे. शनिवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. 

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात जोर कायम आहे. शनिवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाची दमदार हजेरी लागली. त्यामुळे काढणीला आलेल्या मोठ्या प्रमाणातील सोयाबीनचे पीक संकटात सापडले आहे. कपाशीतही बोंडसड वाढली आहे. आधी पावसाचा खंड व आता अतिपाऊस यामुळे बहुतांश भागातील कपाशीला अपेक्षित पाते व बोंडे लागलीच नसल्याचे चित्र आहे. 

 चारपाच दिवसापासून सतत बरसणारा पाऊस शनिवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत तीन मंडलांत अतिवृष्टी रूपात बरसला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील अंबड मंडलात ७९.५० मिलिमीटर, रोहिलागड मंडलात ११४.२५ मिलिमीटर, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्‍यातील येरमाळा मंडलात १०१ मिलिमीटर पाऊस बरसला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, कन्नड, सोयगाव तालुक्‍यांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. इतर तालुक्‍यात सरासरी हलका ते मध्यम पाऊस झाला. बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी हलकी ते मध्यम राहिली. जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, बदनापूर, घनसावंगी, मंठा, परतूर तालुक्‍यात दमदार ते जोरदार पाऊस झाला. तर भोकरदन जाफराबाद तालुक्‍यात पावसाची हजेरी तुलनेने कमी होती. अंबड तालुक्‍यात सर्वाधिक सरासरी ४६.१ मिलिमीटर पाऊस झाला.
 


इतर बातम्या
परभणी, हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन काढणी...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन...
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...