agriculture news in marathi Rain continues in Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गात संततधार सुरुच

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

सिंधुदुर्गनगरीः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खारेपाटण शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गनगरीः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खारेपाटण शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीलगतच्या गावांतील कित्येक एकर शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे.

 गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
संततधारेमुळे जिल्ह्यातील बहुतांशी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. वैभववाडी,कणकवली तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वैभववाडी तालुक्यात अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील शुक, शांती, करूळ, कुसूर, अरूणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शुकनदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खारेपाटण शहरात पूरसदृश स्थिती आहे. खारेपाटण शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य हलविण्यात सुरवात केली आहे. शहरातील घोडेपाथर बंदर रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. 

या शिवाय विजयदुर्ग खाडीलगतच्या मणचे, मालपे, पोंभुर्ले, धालवली, कोर्ले, कुणकवण, शेजवली, वालये, बांदीवडे, चिंचवली या खाडीकाठच्या गावांमधील कित्येक एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली आहे. ती कुजण्याची शक्यता आहे. कणकवली तालुक्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गड आणि जानवली या दोन्ही नद्या ओसंडून वाहत आहेत. देवगड तालुक्यातील किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक आहे.

खाडीकिनाऱ्याच्या काही गावांत पुराचे पाणी साचू लागल्याने या भागात रात्री उशिरा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  मालवण, वेंगुर्ला तालुक्यातही दमदार पाऊस सुरू आहे.


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...