Agriculture news in marathi Rain continues for the third day in Khandesh | Agrowon

खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

जळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने काही प्रकल्पांमधील जलसाठा किंचीत वाढला आहे.

जळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने काही प्रकल्पांमधील जलसाठा किंचीत वाढला आहे. तसेच पावसाची टक्केवारीदेखील ७२ वर पोचली आहे. गेले दोन  दिवस पावसाच्या टक्केवारीत १० ने वाढ झाली आहे. यामुळे टंचाईचे सावट दूर होईल, अशी स्थिती आहे.

पाऊस जोरदार नसल्याने जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर या मोठ्या प्रकल्पांच्या जलसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही. गिरणा धरण ५० टक्के, तर वाधूरमधील साठा ८७ टक्क्यांवर आहे. यात किंचीत अशी वाढ नोंदविण्यात आली आहे. बुधवार (ता.१२), गुरुवार (ता.१३) आणि शुक्रवारीदेखाल (ता.१४) भिज पाऊस सुरू होता. यामुळे ज्वारी, मका, ताग, कोरडवाहू कापूस, बाजरी या पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, आणखी २४ तास पावसाची संततधार सुरू राहिली तर, मूग, उडीद या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

उडीददेखील येत्या आठवड्यात काढणीवर येणार आहे. त्यापूर्वी ऊन किंवा स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक आहे. कारण, यात उडदाची कापणी, ढीग लावणे व मळणीचे काम होईल. यासाठी किमान तीन ते चार दिवस लागतात. परंतु, पाऊस येत्या २१ ऑगस्टपर्यंत सुरूच राहील, असे भाकित हवमान विभागाने व्यक्त केले आहे. यामुळे मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नुकसानीची भीती आहे. 

नदी, नाले खळाळले

गेल्या २४ तासांत जळगाव तालुक्यात ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातपुड्यातील नंदुरबारमधील अक्कलकुवा, धडगाव, चोपडा या भागात अतिवृष्टी झाली आहे. या भागातील तालुक्यांमध्ये प्रत्येकी ६३ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सातपुड्यातील नदी, नाले खळाळून वाहू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातील हिवरा, अग्नावती, अंजनी या नद्यांनाही प्रवाही पाणी आहे. पाऊस (मि.मीमध्ये ) ः धुळे ः शिरपूर ४६, शिंदखेडा ३८, धुळे ५३. जळगाव ः यावल ४५, रावेर ४३, जामनेर ३७. नंदुरबार ः शहादा ४३, तळोदा ५४. 


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...