कोकणात जोर; राज्यात तुरळक सरींचा अंदाज

कोकणात जोर; राज्यात तुरळक सरींचा अंदाज
कोकणात जोर; राज्यात तुरळक सरींचा अंदाज

पुणे: उत्तर भारतात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता ओसरल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यावरील काही ठिकाणांचा अपवाद वगळता, ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडत आहेत. आज (ता. ६) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाब क्षेत्र जमिनीवर आले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातलगत त्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यात पावसाने जोर धरला आहे. तर कोकण वगळता महाराष्ट्रात दोन दिवसांपासून पावसाची मुख्यत: उघडीप असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर, नाशिक, सातारा, पुणे, जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पावसाच्या सरीमागून सरी पडत असून, राज्याच्या अनेक भागांत दिवसातून एखादं, दुसरी सर येत आहे. शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गगणबावडा येथे सर्वाधिक १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

मॉन्सून दिल्लीत पोचला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. ५) उत्तरेकडील आणखी काही राज्यांमध्ये प्रगती केली आहे. मॉन्सूनने संपूर्ण उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि दिल्ली व्यापली आहे. राजस्थान आणि पंजाब, हरियाणाच्या काही भागांत मॉन्सून पोचला आहे. सोमवारपर्यंत (ता. ८) मॉन्सून संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी (ता. ५) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : तलासरी ७०, गुहागर, वैभववाडी, लांजा प्रत्येकी ६०, राजापूर, मुरूड, म्हसळा, प्रत्येकी ५०, कणकवली, अलिबाग प्रत्येकी ४०, श्रीवर्धन, उरण, पोलादपूर, रोहा प्रत्येकी ३०, खालापूर, तळा, संगमेश्वर, मुलदे, महाड, पेन, दोडमार्ग, मंडणगड, कुडाळ, खेड, माणगाव, सावंतवाडी प्रत्येकी २०.  मध्य महाराष्ट्र : गणनबावडा १२०, राधानगरी ५०, आजरा ४०, इगतपुरी, चंदगड, शाहुवाडी, महाबळेश्वर प्रत्येकी ३०, पन्हाळा, पाटण, रावेर, शहादा, गारागोटी प्रत्येकी २०.  मराठवाडा : माहूर १०, शेगाव १०.  विदर्भ : कोर्ची ७०, कुरखेडा धानोरा प्रत्येकी ५०, देसाईगंज, मनोरा, चिखलदारा, ब्रह्मपुरी प्रत्येकी ३०, धारणी, मुलचेरा, मंगरूळपीर, अरमोरी, गडचिरोली, बुलडाणा प्रत्येकी २०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com