पीकविम्याच्या पूर्वसूचनांचा पाऊस

सोमवारी (ता. ४) झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत सुमारे २९,९६,८४३ पूर्वसूचना विमा कंपन्यांना प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Rain of crop insurance forecasts
Rain of crop insurance forecasts

नागपूर ः पीकविमा भरपाईच्या मुद्यावरून गेल्या हंगामात उडालेला असंतोषाचा भडका पाहता या वेळी कृषी विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पीकविमा कंपन्यांकडून त्रुटींवर बोट दाखवीत भरपाई नाकारली जाऊ नये याकरिता आयुक्‍तालय गंभीर असून, प्रत्येक मुद्यावर दक्षतेच्या सूचना सोमवारी (ता. ४) झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत सुमारे २९,९६,८४३ पूर्वसूचना विमा कंपन्यांना प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

विमा कंपन्यांकडून जिल्हास्तरावर दर्शविण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने असलेल्या पत्राच्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे विमा कंपन्यांकडून सर्व्हेक्षण करण्यासाठी येणाऱ्या प्रतिनिधींची शैक्षणिक अर्हता तपासण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. विमा कंपन्यांकडून सर्व्हेक्षणाचे काम कशाप्रकारे पूर्ण होते याकडे देखील कृषी विभाग लक्ष्य ठेवून आहे. राज्यातून विमा कंपन्यांकडे २९,९६,८४३ पूर्वसूचना प्राप्त असून, त्यातील १३,३४,२४५ प्रकरणात विमा कंपन्यांकडून सर्व्हेक्षणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. तर १६,३३,५८९ प्रकरणांमध्ये सर्व्हेक्षण शिल्लक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

कृषी विभागाकडून सावधगिरी  राज्यात या वर्षी सोयाबीनची विक्रमी ४५ लाख हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यासोबतच कपाशीखालील क्षेत्र ३९ लाख हेक्‍टर आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका याच पिकाला बसला आहे. सोयाबीनला कोंब फुटले, तर कापसाची बोंडसड झाली आहे. 

परिणामी, राज्यातील शेतकऱ्यांनी विमा भरपाई मिळावी याकरिता आपल्या जिल्ह्यातील विमा कंपन्यांना पूर्वसूचना दिली आहे. राज्यात सुमारे २९,९६,८४३ पूर्वसूचना कंपन्यांना आजवर प्राप्त झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

त्यासोबतच कपाशीखालील क्षेत्र ३९ लाख हेक्‍टर आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका याच पिकाला बसला आहे. सोयाबीनला कोंब फुटले, तर कापसाची बोंडसड झाली आहे. परिणामी, राज्यातील शेतकऱ्यांनी विमा भरपाई मिळावी याकरिता आपल्या जिल्ह्यातील विमा कंपन्यांना पूर्वसूचना दिली आहे. राज्यात सुमारे २९,९६,८४३ पूर्वसूचना कंपन्यांना आजवर प्राप्त झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पीक नुकसान तसेच विमा भरपाईवरून रणकंदन होण्याची शक्‍यता पाहता कृषी विभागाकडून आतापासूनच सावधगिरीने पावले उचलली जात आहेत. 

जिल्हानिहाय तक्रारी  नगर ः ३०३७६  सोलापूर ः ९५१२८  जळगाव ः १६१८९  सातारा ः ३४१  नाशिक ः ६२७८०  चंद्रपूर ः ५४७  वर्धा ः ४६५  नागपूर ः १४१५  गोंदिया ः ९  वाशीम ः ७९१३२  बुलडाणा ः १०९६१६  यवतमाळ ः ७८३८१  अमरावती ः २४८०३  गडचिरोली ः ५४  भंडारा ः २९  अकोला ः ५५८४४  पालघर ः २४८९  रायगड ः १५६१  कोल्हापूर ः २९७७  सांगली ः १५९६  नंदूरबार ः २०२३  परभणी ः २६८४०४  नांदेड ः ३७१६०३  हिंगोली ः २४९४८९  धुळे ः ११७४०  जालना ः १०८३३३  औरंगाबाद ः १६७८९७  उस्मानाबाद ः २९३५८९  लातूर ः ४३५६६१  बीड ः ५१९९४६  ठाणे ः २३८  रत्नागिरी ः १९६  सिंधुदुर्ग ः ३५९  पुणे ः ३६३३  एकूण ः २९,९६,८४३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com