कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पाऊस

गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने जोर धरला आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात घाटमाथ्यावर; तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने नद्यांमधील पाणीपातळीत वाढ होत आहे.
कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पाऊस
कोल्हापुरातील धरण क्षेत्रात पाऊस

कोल्हापूर: गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने जोर धरला आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात घाटमाथ्यावर; तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने नद्यांमधील पाणीपातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणाची एकूण साठवण क्षमता आठ टीएमसी असून, सध्या धरणात एकूण ३.४६ टीएमसी पाणीसाठा आहे.  मंगळवारी सकाळी ७च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ११००; तर कोयना धरणातून २१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली; तर भोगावती नदीवरील हळदी असे नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. अल्लमट्टी धरणात ७४.०५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा (टीएमसी) मोठे प्रकल्प ः तुळशी १.५३ , वारणा १५.९५, दूधगंगा ११.७४.  मध्यम प्रकल्प ः कासारी १.२७, कडवी ०.९९, कुंभी १.३३, पाटगाव १.७९ .  लघुप्रकल्प ः चिकोत्रा ०.६१ , चित्री ०.६९, जंगमहट्टी ०.३६, घटप्रभा  १.५६ , जांबरे ०.६९, कोदे ०.२१.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com