agriculture news in Marathi rain in dam area Maharashtra | Page 2 ||| Agrowon

धरणक्षेत्रांत पावसाचा जोर 

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. 

पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुलसी, तानसा, मध्य वैतरणा, भातसा धरणांत आवक वाढली आहे. सध्या कोकणात व घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. धारावी या घाटमाथ्यावर सर्वाधिक ११० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

भीमा खोरे पाणलोट क्षेत्रातही बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली आहे. वडीवळे, डिंभे, निरा देवधर, कृष्णा खोरेच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर अधिक होता. पाटगाव, कासारी, राधानगरी, कोयना, तारळी, दूधगंगा या धरणाच्या खोऱ्यांत अधिक पाऊस पडल्याने धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे. भंडारदरा पाणलोटात गत दोन दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला असून, रिपरिप पाऊस सुरू आहे.

या पावसामुळे ओढे-नाले आता खळखळून लागले असून, धरणात विसावू लागले आहेत. धरणात नव्याने २७३ दलघफू पाणी दाखल झाले. या धरणातून विद्युतगृह क्रमांक एकमधून ८४० ने विसर्ग सुरू आहे. दोन दिवसांपासून या भागात अधूनमधून रिपरिप सुरू होती. या पावसाची बऱ्यापैकी चांगली नोंद झाली आहे. पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी शेती कामांत गुंतला आहे. 

मराठवाड्याला वरदान असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा फारसा जोर नाही. मात्र काही भागांत झालेल्या पावसामुळे ०.७४४ टीएमसी (अंदाजे) आवक झाली आहे. विदर्भातही काही भागांत पावसाच्या चांगल्याच सरी कोसळल्या आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा झाला असला तरी धरणांत नव्याने फारशी आवक सुरू झालेली नाही. 

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोर 
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. घाटमाथ्यावर धारावी येथे ११० मिलिमीटर, कोयना ६०, लोणावळा ५०, ताम्हिणी, डुंगरवाडी ४० मि.मी. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुलसी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात २१० मि.मी., विहार १३०, तानसा ८०, मध्य वैतरणा ६०, वैतरणा ५०, भातसा, अप्पर वैतरणा क्षेत्रात ३० मिलिमीटर पाऊस झाला. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...