agriculture news in Marathi rain in dam basin area Maharashtra | Agrowon

धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 जुलै 2020

कोकण किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे, तर सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या मुसळधार सरी पडत आहेत.

पुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे, तर सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या मुसळधार सरी पडत आहेत. घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोटातही पावसाने जोर धरला आहे. मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये साताऱ्यातील महाबळेश्वर येथे १२० मिलिमीटर, तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवस काहीशी उघडीप दिल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मंगळवारी (ता. ७) सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाअभावी रखडलेल्या भातलावणीला गती मिळाली आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोटातही पावसाने जोर धरला आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू झाला आहे. धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. दमदार पावसामुळे भात लागवडीच्या कामालाही वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. जवळपास सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. 

मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : सांताक्रुझ ३०, डहाणू ३५, जव्हार ७९, मोखेडा ४०, पालघर ६४, तलासरी ७२, वसई ४८, विक्रमगड ६३, वाडा ६०, अलिबाग ५४, भिरा ५२, कर्जत ६५, खालापूर ७५, माथेरान ९३, पनवेल ४६, पेण ४७, पोलादपूर ५२, रोहा ६७, सुधागडपाली ८१, तळा ३९, उरण ३८, हर्णे ३०,मंडणगड ४०, पवारवाडी ३७, देवगड ३०, दोडामार्ग ३३, कणकवली ४५, कुडाळ ४४, सावंतवाडी ५२, वैभववाडी ४६, वेंगुर्ला, आंबरनाथ ३२, भिवंडी ४२, कल्याण ५५, मुरबाड ३०, शहापूर ३०, ठाणे ७४, उल्हासनगर ३७.
मध्य महाराष्ट्र : आजरा ३६, चंदगड ३४, गगणबावडा ८२, पन्हाळा ३०, राधानगरी ८२, शाहूवाडी ३३, हर्सूल ३७, इगतपुरी ११५, पेठ ३६, त्र्यंबकेश्वर ४०, वडगाव मावळ ३१, वेल्हे ९३, जावळीमेढा ४६, महाबळेश्वर १२०.
विदर्भ : चांदूरबाजार २०, वरूड २८, मोहाडी ५०, भामरागड २७, धानोरा २५, गोंदिया ४०, गोरेगाव ५४, सडकअर्जुनी ३२, सालकेसा ४२, तिरोडा ३०, मौदा २२, पारशिवणी ३३, रामटेक ५२, आष्टी ३२, खारंघा ३०.

कोकणात पावसाचा अंदाज
सौराष्ट्र आणि परिसरावर असलेल्या ठळक कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. मंगळवारी (ता. ७) सकाळपासून कोकणात पावसाने जोर धरला आहे. आज (ता. ८) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे; तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
उत्तर भारतात मॉन्सूनची प्रगती पुणे : उत्तर भारतात मॉन्सूनला प्रगतीसाठी पोषक...
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
काळ्या भाताच्या लागवडी तथ्य तपासूनच...नाशिक : सध्या राज्याच्या विविध भागांत अनेक शेतकरी...
‘एक राज्य एक ब्रँड’ धोरण स्वीकारा;...औरंगाबाद : अनिष्ट ब्रँड वार रोखण्यासाठी एक राज्य...
बहुमजली, शाश्‍वत, नैसर्गिक शेती पद्धती...मध्य प्रदेशातील तिली (जि. सागर) येथील आकाश...
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...