धरण क्षेत्रात पावसाची हजेरी 

तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
dam
dam

पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने कोयना, गोसी खुर्द, हतनूर अशा महत्त्वाच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोकण, कोल्हापूर, सांगलीतील पूर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  सध्या कोकणातील पावसाचा जोर चांगलाच ओसरला आहे. अनेक भागांत काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने कमीअधिक पाऊस कोसळत आहे. पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. त्यातच नद्या अजूनही दुथडी भरून वाहत असल्याने धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात हलका स्वरूपाचा पाऊस पडला. मागील दोन दिवसांपासून या भागातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक १५९ मिलिमीटर पाऊस पडला. राधानगरीच्या धरणक्षेत्रात १२२, पवना ११७ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित धरणक्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक अजूनही सुरू आहे. त्यामुळे बहुतांश धरणे ही भरण्याच्या मार्गावर आहे. खानदेश, नगर, पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तुरळक सरी पडत आहे. त्यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. 

मराठवाडा, विदर्भात काहीशी उघडीप  मराठवाडा व विदर्भात गेले काही दिवस चांगलाच पाऊस बरसला होता. या पावसामुळे मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली भागात पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू झालेले नाही. विदर्भातही काहीशी अशीच स्थिती आहे. मात्र, तीन ते चार दिवसांपासून पावसाने चांगलीच उसंत घेतल्याने पिकांतील पाणी काही प्रमाणात ओसरले. मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड, जालना या जिल्ह्याच्या अनेक भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील  धरणातील पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नाही.  या नद्या दुथडी भरून वाहत आहेत  कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सुर्या (वैतरणा खोरे), जगबुडी, वाशिष्टी, सावित्री, पंचगंगा, कृष्णा, मुठा, भिमा, गोदावरी (नांदेड), पूर्णा, बाघ, वैनगंगा (भंडारा), कन्हान, वैनगंगा (गोंदिया), बावनथडी, वैनगंगा (चंद्रपूर), वैनगंगा (गडचिरोली), ,  राज्यात सोमवारी (ता.२६) सकाळपर्यंत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये :  कोयना ८८, धोम बलकवडी ७१, धोम १२, कण्हेर २४, वारणावती ६०, दुधगंगा ८०, तुळशी ७१, कासारी ९५, पाटगाव १०३, तारळी ६९, उरमोडी ३१, पिंपळगाव जोगे ३६, माणिकडोह ३१, कळमोडी ५३, वडीवळे २०, पवना ५४, मुळशी ६०, टेमघर ९५, वरसगाव ६०, पानशेत ६४, खडकवासला ३०, कासारसाई ३३, कळमोडी ४५, चासकमान १४, आंध्रा २६, वडीवळे ८७, गुंजवणी ७४, भाटघर ३७, निरा देवघर ७४, डिंभे ४१, वडज १७, चिल्हेवाडी १०, गंगापूर ७१, भंडारदरा ७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com