agriculture news in Marathi rain in dam catchment area Maharashtra | Page 3 ||| Agrowon

धरण क्षेत्रात पावसाची हजेरी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

 तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. 

पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने कोयना, गोसी खुर्द, हतनूर अशा महत्त्वाच्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोकण, कोल्हापूर, सांगलीतील पूर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

सध्या कोकणातील पावसाचा जोर चांगलाच ओसरला आहे. अनेक भागांत काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याने कमीअधिक पाऊस कोसळत आहे. पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. त्यातच नद्या अजूनही दुथडी भरून वाहत असल्याने धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणक्षेत्रात हलका स्वरूपाचा पाऊस पडला. मागील दोन दिवसांपासून या भागातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे.

तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक १५९ मिलिमीटर पाऊस पडला. राधानगरीच्या धरणक्षेत्रात १२२, पवना ११७ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित धरणक्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक अजूनही सुरू आहे. त्यामुळे बहुतांश धरणे ही भरण्याच्या मार्गावर आहे. खानदेश, नगर, पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तुरळक सरी पडत आहे. त्यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. 

मराठवाडा, विदर्भात काहीशी उघडीप 
मराठवाडा व विदर्भात गेले काही दिवस चांगलाच पाऊस बरसला होता. या पावसामुळे मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली भागात पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू झालेले नाही. विदर्भातही काहीशी अशीच स्थिती आहे. मात्र, तीन ते चार दिवसांपासून पावसाने चांगलीच उसंत घेतल्याने पिकांतील पाणी काही प्रमाणात ओसरले. मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड, जालना या जिल्ह्याच्या अनेक भागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील 
धरणातील पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नाही. 

या नद्या दुथडी भरून वाहत आहेत 
कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सुर्या (वैतरणा खोरे), जगबुडी, वाशिष्टी, सावित्री, पंचगंगा, कृष्णा, मुठा, भिमा, गोदावरी (नांदेड), पूर्णा, बाघ, वैनगंगा (भंडारा), कन्हान, वैनगंगा (गोंदिया), बावनथडी, वैनगंगा (चंद्रपूर), वैनगंगा (गडचिरोली), , 

राज्यात सोमवारी (ता.२६) सकाळपर्यंत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये : 
कोयना ८८, धोम बलकवडी ७१, धोम १२, कण्हेर २४, वारणावती ६०, दुधगंगा ८०, तुळशी ७१, कासारी ९५, पाटगाव १०३, तारळी ६९, उरमोडी ३१, पिंपळगाव जोगे ३६, माणिकडोह ३१, कळमोडी ५३, वडीवळे २०, पवना ५४, मुळशी ६०, टेमघर ९५, वरसगाव ६०, पानशेत ६४, खडकवासला ३०, कासारसाई ३३, कळमोडी ४५, चासकमान १४, आंध्रा २६, वडीवळे ८७, गुंजवणी ७४, भाटघर ३७, निरा देवघर ७४, डिंभे ४१, वडज १७, चिल्हेवाडी १०, गंगापूर ७१, भंडारदरा ७२


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...