धरणक्षेत्रात पावसाची हजेरी 

पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने चार ते पाच दिवसापासून उघडीप दिली आहे.
dam
dam

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने चार ते पाच दिवसापासून उघडीप दिली आहे. सध्या धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे गोसीखुर्द, कोयना, हतनूर, वारणा या धरणातून काहीसा पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. कोल्हापूर, सांगली भागातील पूर परिस्थितीही पूर्वपदावर आल्याने येथील कामे सुरळीत सुरू झाली आहेत. 

कोकणात गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी झाला. सध्या कोकणात अनेक भागात पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. संगमेश्वर देवरूख, सांगे येथे ५० मिलिमीटर पाऊस पडला. तर मडगाव येथे ४०, कर्जत, लांजा, केपे, राजापूर, रत्नागिरी ३०, चिपळून, कणकवली, मंडणगड, माथेरान, पोलादपूर, फोंडा, ठाणे, वाल्पोई २०, दापोली, दोडामार्ग, गुहागर, जव्हार, हरणे, खेड, कुडाळ भागातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. ताम्हिणी, कोयना या घाटमाथ्यावर ७० मिलिमीटर पाऊस पडला. तर दावडी, ६०, शिरगाव ५०, भिरा, खंद, डुंगरवाडी, अंबोणे, लोणावळा ३० मिलिमीटर पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या मधूनमधून सरी पडत आहे. काही वेळा ऊन पडत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. महाबळेश्वर येथे ७० मिलिमीटर पाऊस पडला. तर राधानगरी येथे ४०, गगनबावडा, नवापूर, पन्हाळा, शाहूवाडी, वेल्हे येथे २० मिलिमीटर पाऊस पडला. खानदेशात पाऊस नसल्याने अनेक शेतकरी अजूनही प्रतिक्षेत आहेत. मराठवाड्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. वैजापूर येथे अवघ्या १० मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातही पाऊस नसल्याने शेतीतील ओल कमी होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी शेताची कामे वेगाने सुरू आहेत. 

धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :  वैतरणा २८, तोतलाडोह १५, इटियाडोह १९, बाघ शिरपूर ४२, गोसी खुर्द २४, गंगापूर १५, भंडारदरा ५७, डिंभे १२, पानशेत २९, वरसगाव २७, पवना ३२, निरा देवघर १०, धोम बलकवडी १२, वारणा ७०, दूधगंगा ३४, राधानगरी ४२, कोयना ४५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com