agriculture news in Marathi rain in dam water catchment area Maharashtra | Page 2 ||| Agrowon

धरणक्षेत्रात पावसाची हजेरी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने चार ते पाच दिवसापासून उघडीप दिली आहे.

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने चार ते पाच दिवसापासून उघडीप दिली आहे. सध्या धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे गोसीखुर्द, कोयना, हतनूर, वारणा या धरणातून काहीसा पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. कोल्हापूर, सांगली भागातील पूर परिस्थितीही पूर्वपदावर आल्याने येथील कामे सुरळीत सुरू झाली आहेत. 

कोकणात गेल्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी झाला. सध्या कोकणात अनेक भागात पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. संगमेश्वर देवरूख, सांगे येथे ५० मिलिमीटर पाऊस पडला. तर मडगाव येथे ४०, कर्जत, लांजा, केपे, राजापूर, रत्नागिरी ३०, चिपळून, कणकवली, मंडणगड, माथेरान, पोलादपूर, फोंडा, ठाणे, वाल्पोई २०, दापोली, दोडामार्ग, गुहागर, जव्हार, हरणे, खेड, कुडाळ भागातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. ताम्हिणी, कोयना या घाटमाथ्यावर ७० मिलिमीटर पाऊस पडला. तर दावडी, ६०, शिरगाव ५०, भिरा, खंद, डुंगरवाडी, अंबोणे, लोणावळा ३० मिलिमीटर पाऊस पडला. 

मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या मधूनमधून सरी पडत आहे. काही वेळा ऊन पडत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. महाबळेश्वर येथे ७० मिलिमीटर पाऊस पडला. तर राधानगरी येथे ४०, गगनबावडा, नवापूर, पन्हाळा, शाहूवाडी, वेल्हे येथे २० मिलिमीटर पाऊस पडला. खानदेशात पाऊस नसल्याने अनेक शेतकरी अजूनही प्रतिक्षेत आहेत. मराठवाड्यात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. वैजापूर येथे अवघ्या १० मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातही पाऊस नसल्याने शेतीतील ओल कमी होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी शेताची कामे वेगाने सुरू आहेत. 

धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : 
वैतरणा २८, तोतलाडोह १५, इटियाडोह १९, बाघ शिरपूर ४२, गोसी खुर्द २४, गंगापूर १५, भंडारदरा ५७, डिंभे १२, पानशेत २९, वरसगाव २७, पवना ३२, निरा देवघर १०, धोम बलकवडी १२, वारणा ७०, दूधगंगा ३४, राधानगरी ४२, कोयना ४५. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
पेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...