agriculture news in Marathi, rain damage crop in Bhandara District, Maharashtra | Agrowon

भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍टर पिकांचे नुकसान
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

प्राथमिक सर्व्हेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यानुसार पहिल्या टप्प्यातील निश्‍चित नुकसान सोमवारी (ता.१६) येणाऱ्या अहवालातून कळणे अपेक्षित आहे. नदीकाठच्या बुडीत क्षेत्र परिसरात शेती कसणाऱ्या भागातच हे नुकसान झाल्याची शक्‍यता अधिक आहे. 
- हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा

भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थतीमुळे शेकडो हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासोबतच आठवडाभरात विविध घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असतानाही प्रशासनाकडून मात्र अद्यापही नुकसानीसंदर्भाने पंचनाम्याची कारवाई सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. 

भंडारा तालुक्‍यातील नदीकाठावर असलेल्या खैरी, कोथुर्णा, दाभा, टाकळी, माडगी, खमारी, पिंपरी, सुरेवाडा, करचखेडा, कारधा, सिरसघाट, कोरंभी, गणेशपूर, पिंडकेपार, टेकेपार, मौदी खास, जांब, ईटगाव, पागोरा, याशिवाय मोहाडी, तुमसर, लाखांदूर, साकोली अशा नदीकाठच्या सुमारे ८२ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. शेकडो हेक्‍टर धानपीक पाण्याखाली आल्याने कुजले. मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात झालेल्या अतिवृष्टीने अनेक प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे कारधा येथे वैनगंगा नदी धोक्‍याचा पातळीवर वाहत आहे. 

शुक्रवारी (ता.१३) नदीची पातळी ९.३० मीटर इतकी मोजण्यात आली. कालीसराट प्रकल्पाचे चार दरवाजे एक फूट आणि पुजारीटोला धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धापेवाडा प्रकल्पाचे २३ दरवाजे ५.५ मीटरने उघडले आहे. भंडारा तालुक्‍यातील चांदोरी ते शिंगोरी मार्गावर असलेल्या पुलावर पाच दिवस पाणी असल्याने वाहतूक ठप्प पडली होती. 

आठवडाभरात आठ जणांचा मृत्यू
भेंडाळा येथील डेव्हिड गोपाल सोनटक्‍के (वय ८),  खमारी बुज येथील केशव भागो मेश्राम, साकोली तालुक्‍यातील सराटी येथील निखिल केशव खांडेकर (वय १७), हितांशू प्रमोद खोब्रागडे (वय १९) हे वाहून गेले. पवनी तालुक्‍यातील मौदी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला; तिची अद्यापही ओळख पटली नाही. कुडेगाव येथील बबन जयराम कांबडी यांचा मृतदेह शेताच्या धान बांधीतील पाण्यात आढळून आला. सिंदपूरी येथे घराची भिंत कोसळून निलकराम ईसाराम शेंडे (वय ५४) हे ठार झाले. यासोबतच काही ठिकाणी भिंत कोसळून जखमी होण्याचे प्रकारही घडले. चांदोरी-शिंगोरी नाल्याच्या पुरात जनावरांना घेऊन जाणारे वाहन वाहून गेले. यात सहा जवानांचा मृत्यू झाला.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...