Agriculture news in Marathi Rain damage in Nagar, Shevgaon, Pathardi | Page 3 ||| Agrowon

नगर, शेवगाव, पाथर्डीत पावसाने नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021

शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाचा जबर फटका बसला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार या तीन तालुक्यांत ७०० पेक्षा अधिक कुटुंबांना या पावसाचा फटका बसला आहे.

नगर ः शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाचा जबर फटका बसला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार या तीन तालुक्यांत ७०० पेक्षा अधिक कुटुंबांना या पावसाचा फटका बसला असून ३०० पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांचे, नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. पूर ओसरल्यानंतर वास्तव समोर येत असून, पंचनामे सुरू झाले आहेत. तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांना मोठा फटका बसला. दोन तालुक्यांतील सर्वच महसूल मंडळांत नेहमीच्या तुलनेत तब्बल पाच पट अधिक पाऊस झाला. राहुरी, नेवाशातही नुकसान झाले. 

प्राथमिक अहवालानुसार नगर तालुक्यात पावसामुळे देवगांव, रतडगाय, पोखर्डी, जेऊर, डोंगरगण या पाच गावांत सात घराचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यात पावसामुळे घोडेगाव, शिरसगाव, सोनई (धनगरवाडी) या तीन गावांत घरांची अंशतः पडझड झाली. राहुरी तालुक्यात पावसामुळे देसवंडी. राहुरी खु. येथे एकूण दोन घराची पडझड झाली. 

शेवगाव तालुक्यातील आखेगाव, खरडगाव, वरूर खुर्द, वरूर बुद्रुक, भगुर, वडुले बुद्रुक, लांडे व कराड वस्ती, भागात तब्बल सहाशेपेक्षा अधिक कुटुंबाला फटका बसला. याशिवाय आतापर्यंत ९० जनावरांचा मृत्यू झाला असून, ८१ जनावरे बेपत्ता आहेत. मृतजनावरांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाथर्डी तालुक्यात पावसामुळे कोरडगाव सोमठाणे, औरंगपूर, पांगोरी पिंपळगाव येथील नदी काठावरील गावे बाधित झाली आहेत. कोरडगाव गावातील नागरिकांची स्थानिक पथकाच्या साह्याने एकूण ८० कुटुंबाना फटका बसला. पाथर्डी तालुक्यात पावसामुळे मृत पावलेल्या जनावरांची संख्या १२८ असल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. पूर, पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहे. दरम्यान, याबाबतचा सविस्तर पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नुकसानीची नेत्यांकडून पाहणी
शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत पुरामुळे तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानाची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, अॅड, शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, युवा नेते संजय कोळगे, तहसीलदार अर्चना भाकड यांनी शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील नेत्यांनी पाहणी करत लोकांना धीर दिला. तसेच जेवणाची व अन्य व्यवस्था केली.

तातडीने पंचनामे होऊन मदत मिळावी
तिसगाव मढी घाटशिरस परिसरात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त भरपाई द्यावी, अशी मागणी भाऊसाहेब काशिनाथ लवांडे यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे. तिसगाव भागात अतिवृष्टीने अनेक बंधारे फुटले आहेत. शेती ही वाहून गेली आहे. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तिसगाव शहरात पाणी घुसल्याने सुमारे २७ कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे.


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...