Agriculture news in Marathi, Rain damaged the next day in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने नुकसान
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 जून 2019

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावून पुन्हा एकदा शेतकरी अन्‌ नागरिकांची धांदल उडविली आहे. येवला, निफाड, नांदगाव, चांदवड तालुक्यांत पुन्हा एकदा पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माॅन्सूनपूर्व झालेल्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी फटका बसला आहे.

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जिल्ह्यात हजेरी लावून पुन्हा एकदा शेतकरी अन्‌ नागरिकांची धांदल उडविली आहे. येवला, निफाड, नांदगाव, चांदवड तालुक्यांत पुन्हा एकदा पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माॅन्सूनपूर्व झालेल्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी फटका बसला आहे.

उष्णतेचा उकाडा त्यात पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न समोर असताना आलेल्या पावसाने काही प्रमाणात समाधानी केले आहे. मात्र त्यापेक्षा जास्त नुकसानीचा फटका बसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (ता. ७) आणि शनिवारी (ता. ८) झालेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने मोठ्या प्रमाणावर अडचणीत वाढ केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडली, अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर कांदाचाळीसह शेडनेट जमीनदोस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

निफाड तालुका 
निफाड तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात सलग दुसऱ्या दिवशी मोठे नुकसान झाले. सोसाट्याचा वारा आणि गारांच्या तडाख्यात दोन कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात प्रामुख्याने पॉलिहाउस व नर्सरीचे मोठे नुकसान झाले आहे. खडक माळेगाव येथील ओम गायत्री नर्सरीचे ७९ लाख रोपे, अक्षदा नर्सरीत १४ लाख रोपांपैकी १० लाख शिमला, इतर चार लाखांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, कोबी मिरची अशी रोपे आहेत. त्यामुळे नर्सरीतील ९८ लाखांहून अधिक रोपे मातीमोल झाली आहेत. तसेच उगाव ग्रामपालिकेचा सोलर पॅनेल तुटला तसेच वनसगाव येथे नितीन शिंदे यांची द्राक्ष बाग कोसळली. तसेच तालुक्याच्या विविध भागांत झाडे कोलमडली व विजेच्या तारा वीजपुरवठा खंडित झाला होता. 

येवला तालुका 
तालुक्यात आडगाव, सत्यगाव, मुखेड तसेच शहराच्या परिसरातील आवक शेतकऱ्यांच्या शेडनेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. येवल्याचे माजी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे अर्धे शेडनेट उचकले तर आडगाव चोथवा येथील शेतकरी याचे शेडनेट जमीनदोस्त झाली. तसेच येवका कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक शेतकऱ्यांच्या कांदा शेडमधील कांदा भिंल्याने मोठे नुकसान झाले. नगर मनमाड महामार्गावरील मुक्तीभूमी जवळील मुख्य कमान रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच शहरातील विविध भागांतील घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांचे नुकसान झाले. 

चांदवड तालुका 
चनद्वाद तालुक्याच्या दकाहीं पूर्व भागातही वादळी पावसाने थैमान घातल्याने काही गावात मोठे नुकसान झाले. अनेक गारांचा कौले पडली, पत्रे उडाले तर खांब वाकल्याने विजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. पिंपळद येथे पावसामुळे झाड पडले त्यात मनोहर मेंगळ हे दाबल्या गेल्याने जखमी झाले, तर निंबाळे गावात वीज पडून बैल मृत्युमुखी पडला. रेडगाव येथे अनेक शेतकऱ्यांच्या शेततळ्यांचे वादळाने कागद उडून गेले. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस झाला. 

नांदगाव तालुका 
सलग दोन दिवसांपासून मनमाड शहरात पाऊस स्थिरावला होता. मात्र गारांचा तडाखा त्यात वादळी वाऱ्यांनी अनेक भागांत मोठे नुकसान झाले. मनमाड शहरातही झाडे पडली, घराचे पत्रे उडाले आणि विजेचे खांब पडून विजतारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित होता. येथील विवेकानंद नगर भागातील चंद्रभागा लॉन्सचे छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
वाशीम : मानवी साखळीतून साकारले निवडणूक...वाशीम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
चौथीच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा...मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...