हाता तोंडाशी आलेला घास गेला; द्राक्ष उत्पादकांना अश्रू अनावर...

गेल्या तीन दिवसांपासून सटाणा तालुक्यातील विविध भागांत दाट धुके व अवकाळी पावसाच्या हलक्या सरी सुरूच असल्याने सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्याच्या हाततोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
हाता तोंडाशी आलेला घास गेला; द्राक्ष उत्पादकांना अश्रू अनावर...
हाता तोंडाशी आलेला घास गेला; द्राक्ष उत्पादकांना अश्रू अनावर...

तळवाडे दिगर, जि. नाशिक : यंदा लांबलेला पावसाला व त्यानंतरही दर महिन्यात होत असलेला वातवरणातील बदलामुळे सुरुवातीपासूनच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करत प्रचंड मेहनतीचे शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी निर्यातक्षम द्राक्ष तयार केले होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सटाणा तालुक्यातील विविध भागांत दाट धुके व अवकाळी पावसाच्या हलक्या सरी सुरूच असल्याने सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्याच्या हाततोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून, शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. सटाणा तालुक्यातील पूर्वहंगामी द्राक्ष बागा काढण्यासाठी आल्या आहेत. त्यातच सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व दाट धुक्याचा फटका बसून तळवाडे दिगर गावातील जवळपास ५० ते ६०  एकरांवरील काढणी योग्य व काढणी सुरू असलेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन खराब झाले असून, सुमारे एक ते दीड कोटीचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथील भास्कर ठाकरे, पंकज ठाकरे, हेमंत पवार, मुरलीधर पवार, चंद्रकांत आहिरे, श्रावण ठाकरे, बाजीराव पवार, कृष्णा रौदळ, मंगेश पवार, भिका आहिरे, नामदेव आहिरे, लक्ष्मण पवार आदि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.   अवकाळीमुळे लाखो रुपयांचे नुकसान  पोटच्या पोरांची नाही एवढी काळजी घेऊन तळवाडे दिगर येथील भास्कर मोठाभाऊ ठाकरे या युवा शेतकऱ्याने आपल्या तीन एकर क्षेत्रावरील सोनाका या जातीच्या द्राक्षांची लागवड केली आहे.त्यासाठी निर्सगाशी दोन हात करत ४ लाख रुपये खर्च करून निर्यातक्षम द्राक्ष पिकवले होते व ९५ रुपये प्रतिकिलोने व्यापाऱ्यास दिले मात्र, उद्या सकाळी काढणीला सुरुवात होईल अशा परिस्थिती रात्रीत झालेल्या हवामानातील बदल व अवकाळी पावसामुळे २० लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती गावातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com