राज्यात आज कमी पावसाची शक्यता; कमी दाब क्षेत्र ओसरले

राज्यात आज कमी पावसाची शक्यता; कमी दाब क्षेत्र ओसरले
राज्यात आज कमी पावसाची शक्यता; कमी दाब क्षेत्र ओसरले

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान परिसरावर असलेल्या या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. आज (ता. १०) राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे शुक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस पडला. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. उत्तर महाराष्ट्रातील नवापूरच्या आक्रणी येथे २७० मिलिमीटर, धुळ्यातील शिरपूर येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून, आज (ता. १०) गुजरातमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकणसह पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :

  • कोकण : खालापूर, दोडामार्ग प्रत्येकी ९०, वाकवली ६०, जव्हार ५०, पोलादपूर, भिरा, कणकवली राजापूर, खेड, मुलदे प्रत्येकी ४०.
  • मध्य महाराष्ट्र : आक्रणी २७०, शिरपूर २१०, अक्कलकुवा १९०, महाबळेश्वर १७०, तळेादा १६०, राधानगरी, शहादा प्रत्येकी १५०, आजरा १४०, नवापूर, नंदुरबार प्रत्येकी १२०, सिंदखेडा ११०, पन्हाळा, चंदगड, गारगोटी प्रत्येकी १००, गडहिंग्लज, चोपडा, प्रत्येकी ९०, शाहूवाडी ८०, यावल, पौड, त्र्यंबकेश्वर, जळगाव, भुसावळ, धरणगाव प्रत्येकी ७०, जावळीमेढा, अमळनेर, इगतपुरी, वेल्हे, एरंडोल, पारोळा, रावेर प्रत्येकी ६०, साक्री, पाटण, सुरगाणा, मुक्ताईनगर, पेठ प्रत्येकी ५०.
  • मराठवाडा : माहूर ३०, किनवट, सोयगाव, जाफराबाद प्रत्येकी २०.
  • विदर्भ : मौदा १२०, चिखलदारा ११०, धारणी १००, नागपूर ९०, चांदूरबाजार, भंडारा, हिंगणा, आर्वी प्रत्येकी ८०, मोहाडी, तुमसर, आष्टी, वर्धा, मोर्शी प्रत्येकी ७०, तिरोड, लाखणी, सेलू, संग्रामपूर, अंजनगाव, देवळी, चांदूररेल्वे, तिवसा, तल्हारा, धामणगाव रेल्वे, परतवाडा, जळगाव जामोद, कुही, कामठी, मुलचेरा प्रत्येकी ६०, नरखेडा, सावनेर, अकोला अमरावती, वरूड, दर्यापूर, नांदूरकाझी, करंजालाड, परशिवणी, बेलापूर, पातूर, हिंगणघाट, बार्शीटाकळी, खारंघा, रामटेक, शेगाव प्रत्येकी ५०.
  • घाटमाथा : आंबोणे १२०, शिरगाव ११०, दावडी १००, ताम्हिणी ९०, वाणगाव ६०. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com