agriculture news in Marathi, rain deficit in 17 districts in state, Maharashtra | Agrowon

सतरा जिल्ह्यांत पावसाची दडी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जुलै 2019

पुणे : कोकणसह, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दमदार बरसणाऱ्या पावसाने अद्यापही विदर्भ, मराठवाड्यात ओढ दिली आहे. जुलै महिना उलटून, निम्मा पावसाळा संपत आला. तरीही अद्याप राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. २८ जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला आहे. तर ६ जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करता विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील तालुक्यात पावसाची ओढ असल्याचे दिसून येते.

पुणे : कोकणसह, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दमदार बरसणाऱ्या पावसाने अद्यापही विदर्भ, मराठवाड्यात ओढ दिली आहे. जुलै महिना उलटून, निम्मा पावसाळा संपत आला. तरीही अद्याप राज्याच्या अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. २८ जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाड्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला आहे. तर ६ जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करता विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील तालुक्यात पावसाची ओढ असल्याचे दिसून येते.

मुंबईसह कोकणात पावसाने तडाखा दिल्याने धरणे ओव्हरफ्लो झाली. अनेक ठिकाणी पूरस्थितीचा सामना करावा लागला. तर मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यालगत असलेल्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे या जिल्ह्यांची सरासरी भरून निघाली. धरणांच्या पाणलोटात झालेल्या पावसाने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, मराठवाड्यासह, विदर्भातील अनेक धरणे अद्यापही तळशीच आहेत. थोड्याफार पावसाने खरीप पिकांना जीवदान दिले असले तरी, काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची भीती आहे.

हवामान विभागाकडील नोंदीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, तेथे सरासरीपेक्षा ८२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच सरासरीच्या तुलनेत उणे ५२ टक्के पाऊस पडला आहे. ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, नगर, धुळे जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी ओलांडली आहे. जळगाव, नंदूरबार, सांगली, औरंगाबाद, बुलडाणा, नागपूर जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे.

पावसाने ओढ दिलेले जिल्हे, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (टक्के) :
सोलापूर (-४२), जालना (-२३), बीड (-४२), उस्मानाबाद (-३०), परभणी (-३५), लातूर (-३८), हिंगोली (-३५), नांदेड (-३३), अकोला (-२२), अमरावती (-३१), वाशीम (-४०), यवतमाळ (-५२), वर्धा (-२८), चंद्रपूर (-३१), भंडारा (-३८), गोंदिया (-४०), गडचिरोली (-३१).

इतर अॅग्रो विशेष
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...