देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूट

पाऊस
पाऊस

पुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून, अद्यापही मॉन्सूनने देश व्यापला नाही. सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये काही भागात पूरस्थिती असली, तरी इतर भागांत पाऊस नाही. तसेच मध्य भारत, पूर्व, दक्षिण भारतात पावसाने दडी मारली आहे. देशातील २४ राज्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असून पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, मणिपूर, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि हरियाना या राज्यांमध्ये पावसात सरासरीच्या तुलनेत जास्त तूट आली आहे.      बिहार बिहार राज्यातील ३८ जिल्ह्यांपैकी तब्बल ३२ जिल्ह्यांमध्ये पावसात तूट आली आहे. १० जुलैपर्यंत राज्यात सरासरी २७७.७ मि.मी पाऊस पडत असतो. परंतु यंदा २३७ मि.मी पाऊस झाला असून, १५ टक्के तूट आली आहे. यापैकी सहा जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधीक तूट आहे तर एका जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आहे. बिहार राज्यात यंदाही अनेक भागांत दुष्काळी स्थिती आहे. राज्यात सर्वांत कमी बेगुसराय जिल्ह्यात केवळ ४१ टक्के पाऊस झाला आहे.  उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशात ७५ जिल्ह्यांपैकी ४५ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या कमी पाऊस झाला आहे. १० जुलैपर्यंत राज्यात १६७ मि.मी. पाऊस पडत असतो, परंतु यंदा १५१ मि.मी. पाऊस झाला असून, पावसात ९ टक्के तूट आली आहे. २१ जिल्‍ह्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधीक तूट असून, ५० टक्क्यांपेक्षा अधीक तूट असलेले जिल्हे १२ आहेत. ७० टक्क्यांपेक्षा जास्त तूट असेलेले जिल्हे ७ असून, चार जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधीक तूट आली आहे. गौतमबुद्धनगर ८३, मुझफ्फरनगर ८१, शामली ८१ टक्के तूट आली आहे. तर श्‍यामली जिल्ह्यात सर्वांत कमी ९ टक्के पाऊस झाला असून, ९१ टक्के तूट आली आहे.   आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशात सरासरीच्या तुलनेत ३८ टक्के तूट आली आहे. आंध्र प्रदेशात १० जुलैपर्यंत १२६.९ मि.मी. पाऊस पडत असतो. मात्र यंदा ५९.४ मि.मी. पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसात तूट आली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधीक तूट आली आहे. तमिळनाडू तमिळनाडूमध्ये ३२ जिल्ह्यांपैकी २९ जिल्ह्यांमध्ये तूट आली आहे. राज्यात ७३.९ मि.मी. सरासरी पाऊस होत असतोच परंतु यंदा ४०.३ मि.मी. पाऊस झाला आहे. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ४० टक्क्यांपेक्षा अधीक तूट आली असून, ५० टक्क्यांपेक्षा अधीक तूट असलेले जिल्हे १३ आहेत. ७० टक्क्यांपेक्षा जास्त तूट आठ जिल्ह्यांमध्ये आली असून, चार जिल्ह्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त तूट आली आहे. म्हणजे या चार जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या केवळ २० टक्के पाऊस झाला आहे. तर दोन जिल्ह्यांमध्ये केवळ १० टक्के पाऊस झाला असून, सरासरीच्या तुलनेत ९० टक्के तूट आली आहे. मध्य प्रदेश मध्य प्रदेशात यंदा चांगला पाऊस आहे. राज्यात यंदा २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस आहे. राज्यातील ५१ जिल्ह्यांपैकी ७ जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यात सर्वांत कमी ४९ टक्के पाऊस झाला असून, ५१ टक्के तूट आली आहे.  गुजरात  गुजरात राज्यातील २३ जिल्ह्यांपैकी २५ जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरीच्या कमी पाऊस झाला आहे. राज्यातील अहमदाबाद ५१ टक्के, जामनगर ५३, कच्छ ८५, मोरबी ६३, पोरबंदर ५९, राजकोट ५४ टक्के या जिल्ह्यांध्ये सर्वाधिक तूट आली आहे. राज्यातील अनेक भागांत यंदाही पाणीटंचाईची भीषण स्थिती आहे.     हरियाना हरियाना राज्यात यंदा पावसात ५४ टक्के तूट आली आहे. राज्या सरासरी ८६.२ मि.मी. पाऊस पडत असतो, परंतु यंदा केवळ ३८.९ मि.मी. पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वच २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. १९ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक तूट अाली असून, १४ जिल्ह्यांध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आली आहे. पंजाब पंजाब राज्यातील २० जिल्ह्यांपैकी १९ जिल्ह्यांध्ये सरासरीपेक्षा कमी झाला आहे. राज्यात पाच जिल्ह्यांत सरासरपेच्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आली आहे. तर १४ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आली आहे. १० जुलैपर्यंत राज्यात ९७.७ मि.मी. पाऊस पडत असतो. मात्र यंदा केवळ ५४.५ मि.मी. पाऊस झाला आहे.     उत्तराखंड उत्तराखंड राज्यात संपूर्ण १३ जिल्ह्यांमध्ये पावसात तूट आली आहे. राज्यात १० जुलैपर्यंत २९०.७ मि.मी. पाऊस पडत असतोच परंतु यंदा १६३ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसात ४४ टक्के तूट आली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त तूट आली आहे. तर ६ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आली आहे.  अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशात सरासरीच्या ८६ टक्के पाऊस झाला आहे. दोन जिल्ह्यांमध्ये पावसातील तूट ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तवांग जिल्ह्यात केवळ २८ टक्के पाऊस झाला असून, ७२ टक्के तूट आहे. अंजाव जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ४७ टक्के पाऊस झाला असून, ५३ टक्के तूट आली आहे. तर तिराप जिल्ह्यात ४८ टक्के पाऊस झाला. कर्नाटक कर्नाटक राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत १४ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील २६ जिल्ह्यांपैकी १८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. कर्नाटक राज्यात मागील वर्षीही दुष्काळी स्थिती होती. तर यंदाही अनेक भागांत पाऊस नसल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत.  केरळ केरळ राज्यात १० जुलैपर्यंत ८९०.९ मि.मी. एवढी सरासरी आहे. मात्र यंदा ५०९.३ मि.मी. पाऊस झाला आहे. यंदा पावसात ४३ टक्के तूट आली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत तूट आली असून, १५ जिल्ह्यांपैकी नऊ जिल्ह्यांमध्ये पावसात ४० टक्क्यांपेक्षा अधीक तूट आली आहे. तर तीन जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधीक तूट आली आहे.  आसाम आसाम राज्यात सरीसरी पावसात १५ टक्के तूट आली आहे. राज्यातील दारांग जिल्ह्यात सर्वात कमी ९७.१ मिलिमीटर म्हणजेच १८ टक्के पाऊस झाला आहे. दोन जिल्ह्यांत ४० ते ५० टक्क्यांपर्यंत तूट आहे, तर तीन जिल्ह्यांमध्ये पावसात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत तूट आहे. मेघालय राज्यातही पावसात १५ टक्के तूट आली आहे.  नागालॅंडमध्ये पावसात २२ टक्के तूट आली आहे. राज्यातील वोखा जिल्ह्यात केवळ ९ टक्के पाऊस झाला. ओडिशा राज्यात सरासरी ३१६ मि.मी. पाऊस होतो. त्यापैकी यंदा २७२ मि.मी. पाऊस झाला असून, पावसात १४ टक्के तूट आली आहे. झारखंड  झारखंड राज्यामध्ये १० जुलैपर्यंत २९९ मि.मी. पाऊस होतो. यंदा मात्र २०७ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ६९ टक्के पाऊस झाला असून, ३१ टक्के तूट आली आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांंमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यापैकी आठ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आली असून, तीन जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आली आहे.  पश्‍चिम बंगालमध्ये ६१ टक्के पाऊस पश्‍चिम बंगालमध्ये १० जुलैपर्यंत सरासरी ४५९ मि.मी. पाऊस पडतो. परंतु यंदा केवळ २७१.६ मि.मी. म्हणजेच केवळ ६१ टक्के पाऊस झाला. राज्यातील सर्वच १९ जिल्ह्यांमध्ये पावसात तूट आली आहे. १३ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आहे, तर सहा जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत तूट आली आहे. राज्यातील अनेक भागांत अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. मणिपूरमध्ये ६० टक्के तूट मणिपूर राज्यात सर्वांत जिल्ह्यात पावसामध्ये तूट पडली आहे. राज्यात १० जुलैपर्यंत पावसाची सरासरी ५४१ मिलिमीटर असून, केवळ २१४ मि.मी. पाऊस झाला आहे. सरासरीच्या केवळ ४० टक्के पाऊस झाला असून, पावसात तब्बल ६० टक्के तूट आली आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांपैकी तब्बल सहा जिल्ह्यांध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर चार जिल्ह्यांत ७० टक्क्यांपेक्षा अधिक तूट आली आहे. तर चांडेल जिल्ह्यात केवळ १२ टक्के पाऊस झाला असून, ८८ टक्के तूट आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com