agriculture news in Marathi, rain deficit in Vidarbha, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

अकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजवर झालेला पाऊस असमतोल पडल्याने बिकट परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. प्रामुख्याने या वर्षी बुलडाण्यात समाधानकारक पाऊस झालेला असतानाच अकोला, वाशीम पिछाडीवर आहेत. अकोल्यात सरासरीच्या २३.८५ टक्के तर वाशीम जिल्ह्यात १९.९५ टक्के पाऊस झाला. या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्यांना सुरवात झाली. जुलै महिना निम्मा संपला, तरी पावसाचा जोर वाढू शकलेला नाही.  

अकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजवर झालेला पाऊस असमतोल पडल्याने बिकट परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. प्रामुख्याने या वर्षी बुलडाण्यात समाधानकारक पाऊस झालेला असतानाच अकोला, वाशीम पिछाडीवर आहेत. अकोल्यात सरासरीच्या २३.८५ टक्के तर वाशीम जिल्ह्यात १९.९५ टक्के पाऊस झाला. या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्यांना सुरवात झाली. जुलै महिना निम्मा संपला, तरी पावसाचा जोर वाढू शकलेला नाही.  

उघडीप दिल्याने चिंता 
या खरीप हंगामात पेरणीमध्ये बुलडाणा जिल्हा सुरवातीपासून आघाडीवर आहे. या जिल्ह्यात ९० टक्क्‍यांवर पेरणी पोचली आहे.  वाशीम जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या आटोपल्या. अकोल्यात पेरण्या ७५ टक्क्यांपर्यंत झाल्या आहेत. पेरण्यांना विलंब होत असल्याने अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने आता कापूस व सोयाबीन लागवडीवर परिणामाची शक्यता दिसून येत आहे. काही ठिकाणी १० ते १२ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. अशा ठिकाणी हा खंड आणखी वाढल्यास पिके धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. काही शेतकऱ्यांनी हा अंदाज घेत सिंचनाचे काम सुरू केले आहे.    
 
पाणीसाठा चिंताजनक
वऱ्हाडातील काटेपूर्णा प्रकल्पात ३.९५ दलघमी साठा आहे. वान प्रकल्पात २६.१६, नळगंगा प्रकल्पात ७.२७, पेनटाकळी प्रकल्पात १९.३८ आणि खडकपूर्णामध्ये शून्य दलघमी साठा आहे. मागील वर्षभर तीव्र पाणीटंचाई जाणवली होती. सध्या पावसाचा दीड महिना होऊनही नदी-नाल्यांना पाणी न वाहल्याने बहुतांश भागात टंचाई कायम आहे. बुलडाण्यात सव्वाशेपेक्षा अधिक टॅंकर बंद झाले ही दिलासादायक बाब आहे. या जिल्ह्यात बुलडाणा, संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, खामगाव तालुक्यांमध्ये आजवर चांगला पाऊस झालेला आहे. अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई अद्याप कायम आहे. पातूर तालुक्यातील काही गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे.


इतर अॅग्रो विशेष
अमेरिकन लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमणपुणे ः खरिपाची पेरणी होऊन महिना उलटत नाही तोच...
रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का...नाशिक ः फळे आणि भाजीपाला पिकांवर रासायनिक...
देशात ९२ लाख हेक्टरवर कापूसमुंबई: देशात कापूस लागवडीने वेग घेतला आहे....
राज्यातील धरणांमध्ये २८ टक्के पाणीसाठापुणे : जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तसेच...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक...अकोला ः अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई...
‘आपले सरकार’ पारदर्शकच हवेचालू खरीप हंगामासाठी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत...
शेती म्हणजे रोजगार हमी योजना आहे का?खूप दिवसांनंतर एका कार्यकर्ता मित्राचा फोन आला....
मराठवाड्यात कपाशीची ८० टक्के पेरणीऔरंगाबाद :  सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत...
सोयाबीन बियाणेप्रकरणी ३० हजार तक्रारी ः...यवतमाळ : सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात...
मुंबईसह उत्तर कोकणात जास्त, तर दक्षिणेत...पुणे : राज्याच्या विविध भागांत हलक्या ते...
क्रांती कारखान्याचा ऊस बेण्यासाठी ‘माझी...सांगली : शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस बेणे मिळाले तरच...
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला यंदा केवळ...पंढरपूर जि. सोलापूर ः आषाढी यात्रेला श्री विठ्ठल...
सांगोल्यात माडग्याळ मेंढ्याला लाखात बोलीसोलापूर ः  तांबूस, पांढरा ठिपक्याचा रंग,...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यता पुणे : सौराष्ट्र आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे...
राज्यात खरिपाची ६५ टक्के पेरणीपुणे : राज्यात २२ जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला...
पाणलोट गैरव्यवहाराची चौकशी दडपलीपुणे : पाणलोट आणि मृद्संधारण कामांमध्ये कोट्यवधी...
बियाण्यांची समस्या गुणवत्तेशी निगडित...पुणे : राज्यातील शासकीयच नव्हे; तर खासगी...
'सन्मान निधी'चे २०९६ कोटी अडकलेसोलापूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...