बुलडाण्यात धाड भागात पाऊस

बुलडाण्यात धाड भागात पाऊस
बुलडाण्यात धाड भागात पाऊस

बुलडाणा : मराठवाड्याला लागून असलेल्या काही गावांमध्ये रविवारी (ता. १४) रात्री विजांच्या कडकडासह पाऊस झाला. प्रामुख्याने धाड परिसरात १० मिनिटे पाऊस झाला. या वेळी वादळी वाऱ्यामुळे आंब्यांचे नुकसान झाले. विजेचे खांब पडले. तारा तुटल्याने शाॅर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटनासुद्धा घडल्याची माहिती मिळाली.

धाडसह परिसरात रात्री ७ वाजेनंतर अचानक मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. १० ते १५ मिनिटे हा पाऊस झाला. याच दरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडे कोसळल्याने दुकानांचेही नुकसान झाले. धाड येथील शेख मतीन पाशा यांनी तीन एकरांतील मक्याची कुटी केली होती. शॉटसर्किटमुळे आग लागून ती जळाली. सोबतच स्प्रिंकलर पाइप जळाले. बोरखेड येथे वादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले. सोमवारी (ता. १५) तलाठ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. 

ढगाळ वातावरण, उकाडा कायम वातावरणातील अचानक बदलामुळे तापमानात थोडी घट झाली. वऱ्हाडातील तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. अकोला जिल्ह्यातील पारा ४४ अंशांपर्यंत पोचला. सोमवारी (ता. १५) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे तापमान ४० अंशांच्या आत आले. मात्र वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला होता.

काही ठिकाणी पाऊस येईल की काय, अशी स्थिती होती. पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची बीजोत्पादनाचा कांदा काढण्याची लगबग सुरू होती. दिवसभर शेतांमध्ये मजूर काम करताना दिसत होते. आणखी दोन दिवस असे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याचे संदेश सोशल मीडियावरून सर्वत्र फिरत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com