agriculture news in marathi, rain in district, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जुलै 2019

पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर, जुन्नर या तालुक्यांच्या कोरडवाहू पट्ट्यात शुक्रवारी दुपारनंतर मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली. शिरूर येथे सर्वाधिक १२० मिमी तर बारामती आणि इंदापूर तालुक्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पावसाने दडी मारल्यामुळे संकटात सापडलेल्या खरीप पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. 

पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरवात झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेल्या बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर, जुन्नर या तालुक्यांच्या कोरडवाहू पट्ट्यात शुक्रवारी दुपारनंतर मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली. शिरूर येथे सर्वाधिक १२० मिमी तर बारामती आणि इंदापूर तालुक्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पावसाने दडी मारल्यामुळे संकटात सापडलेल्या खरीप पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. 

पूर्व भागातील तालुक्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. शुक्रवारी सकाळपासून असलेल्या उन्हाच्या चटक्याने उकाड्यात वाढ झाली. दुपारनंतर मेघगर्जना, विजांसह जोरदार पावसाला सुरवात झाली.बारामती, इंदापूर तालुक्यांत सर्वदूर चांगला पाऊस पडला. बारामती तालुक्यातील बारामती शहर, माळेगाव, पनदरे, वडगाव, लोणी भापकर, इंदापुरातील सणसर येथे अतिवृष्टीची नोंद झाली. शिरूर आणि जुन्नर, पुरंदर तालुक्यांतही पावसाने दिलासा दिला. 

शनिवारी (ता. २०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिमी) : (स्रोत - महसूल विभाग) : थेऊर २६, थेरगाव ३५, किकवी ५२, वडगाव आनंद ३७, निमगाव सावा ४७, बेल्हे २७, आळंदी ३०, रांजणगाव १२०, कोरेगाव २३, बारामती ८०, माळेगाव ७६, पनदरे ९५, वडगाव ९०, लोणी भापकर ८९, सुपा ४५, लोणी ३५, बावडा २६, काटी ३३, निमगाव केतकी ३५, सणसर ७७, केडगाव २५, दौंड ३६.
 
खडकवासला प्रकल्पात ५१ टक्के पाणीसाठा
पुणे शहरासह  हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये शनिवारी १४.८१ टीएमसी (५१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणात १.६१ टीएमसी, पानशेतमध्ये ५.९६ टीएमसी, वरसगावमध्ये ५.७४ टीएमसी, आणि टेमघर धरणात १.५० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा प्रकल्पात २५ टक्के कमी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी धरणांमध्ये २२.०४ टीमएसी (७६ टक्के) पाणी जमा झाले होते.

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...