पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर आेसरला

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर आेसरला
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर आेसरला

पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर आेसरला आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पश्‍चिम भागातील तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, पूर्व भागात पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. धरणांच्या पाणलोटात पाऊस कमी झाल्याने पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे.

आठवड्याच्या सुरवातीपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, जिल्ह्यात ऊन सावल्यांसह अधूनमधून पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवांधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने नद्यांना पूर आले. मात्र, पाऊस ओसरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी डिंभे धरणातून २ हजार ७०० क्युसेक, घोड धरणातून १० हजार क्युसेक, चासकमान ३ हजार, भामा अासखेड २ हजार, मुळशी ६ हजार, पानेशत तीन हजार, खडकवासला धरणातून सुमारे ११ हजार, गुंजवणी २ हजार, नीरा देवघर २ हजार, भाटघर सुमारे ३ हजार आणि वीर धरणातून १३ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस कमी झाल्याने विसर्ग आणखी होणार आहे. दौंड येथे भिमा पात्रातून सुमारे ४८ हजार क्युसेक वेगाने उजनी धरणात पाणी जमा होत होते.

शुक्रवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : पौड ११, घोटावडे १२, माले २७, मुठे ४५, भोर १६, भोलावडे २७, अांबवडे २६, निगुडघर ३३, काले १३, कार्ला १२, लोणावळा ३१, शिवणे १०, वेल्हा १७, पानशेत १३, राजूर १७, डिंगोरे १०, वाडा २८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com