agriculture news in marathi, rain in dryland area, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात दमदार पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. कोरडवाहू पट्ट्यातील बारामती, शिरूर, इंदापूर, दौंडसह, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात रविवारी (ता. २३) दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर वाफसा मिळताच खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.  

पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. कोरडवाहू पट्ट्यातील बारामती, शिरूर, इंदापूर, दौंडसह, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात रविवारी (ता. २३) दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर वाफसा मिळताच खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.  

शिरूर तालुक्यातील न्हावरे परिसरात एक ते दीड तास दमदार पाऊस झाला. निर्वी येथे कांदा झाकण्यासाठी गेलेल्या अक्षय ज्ञानदेव पवार (वय २०) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या साचलेल्या पाण्याचे शेतकऱ्यांनी नारळ वाहून पूजन केले. ग्रामस्थांनी श्रमदानातून खोदलेले सलग समतल चर भरून वाहू लागले. सोमेश्वरनगर परिसरात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्याच पावसाने शेतात पाणी साचल्याने बळिराजा सुखावला आहे. हा पाऊस खरिपाच्या पेरण्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

शेतात उभी असलेली ऊस, टोमॅटो, भाजीपाला व चारा पिके जळूनच चालली होती. या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे. इंदापूर तालुक्यातील पश्‍चिम भागामधील लासुर्णे, अंथुर्णे, भरणेवाडी, वालचंदनगर, कळंब, निमसाखर, निरवांगी परिसरांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. भरणेवाडीमधील अमर बोराटे यांच्या शेतामधील पाऊण एकर क्षेत्रात तोंडल्याच्या बागेमधील लाकडाचा माळा कोसळून भुईसपाट झाला.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील चास, कमान व मोहकल परिसरांत मुसळधार पावसाने शेतजमिनींसह शेतीमालाचे मोठे नुकसान झाले, अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटून शेतातील माती वाहून गेली, विहिरीसह विद्युत मोटर गाडली गेली, आखरवाडी, चास, कमान, मोहकल व कान्हेवाडीच्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडला. भाताच्या लागवडीसाठी तयार करण्यात येत असलेली रोपे या मातीमध्ये गाडली गेली. सोयाबीनच्या पेरण्या झालेल्या शेतांमध्ये पाणी साचल्याने बियाणे सडण्याची भीती व्यक्त होत आहे. आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागात वळवाच्या पावसावर भातरोपे तरारली असून, या रोपांना आता पावसाची नितांत गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...