agriculture news in marathi, rain in eleven revenue mandal, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात चांगला पाऊस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 जून 2019

नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने शनिवारी (ता. २२) हजेरी लावली, मात्र अजूनही सर्वच भागांत चांगल्या पावसाने सुरवात केलेली नाही. प्रशासनाच्या आकडेवाडीनुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत (रविवार) दहा टक्के कमी पाऊस झाला आहे. शनिवारी रात्री कोपरगाव, नेवासा, कर्जत, राहुरी, शेवगाव, नगरसह सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अकरा महसूल मंडळात चांगला पाऊस झाला. कोपरगाव मंडळात सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोले तालुक्यात अजूनही पुरेसा पाऊस सुरू झालेला नाही. 

नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने शनिवारी (ता. २२) हजेरी लावली, मात्र अजूनही सर्वच भागांत चांगल्या पावसाने सुरवात केलेली नाही. प्रशासनाच्या आकडेवाडीनुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत (रविवार) दहा टक्के कमी पाऊस झाला आहे. शनिवारी रात्री कोपरगाव, नेवासा, कर्जत, राहुरी, शेवगाव, नगरसह सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अकरा महसूल मंडळात चांगला पाऊस झाला. कोपरगाव मंडळात सर्वाधिक १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोले तालुक्यात अजूनही पुरेसा पाऊस सुरू झालेला नाही. 

दुष्काळाने गेली वर्षभर होरपळ होत असलेल्या नगर जिल्ह्याला चांगला पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत दहा टक्के पाऊस कमी आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत २१.९० टक्के पाऊस झाला होता तर यंदा आतापर्यंत १२.६४ टक्के पाऊस झाला आहे. यंदा आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक ३८.३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक कमी २.८८ टक्के पाऊस संगमनेर मध्ये झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव, रवंदे, टाकळी या गावांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे शेतातून वाहून आलेल्या पाण्याने ब्राह्मणगाव शिवारात संतोष ठक्कर या कांदा व्यापाऱ्याचा दहा ते बारा ट्रॅक्टर म्हणजे २० ते २२ टन कांदा वाहून गेल्याने नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील सर्व ९७ महसूल मंडळात शनिवारी पावसाने हजेरी लावली असली तरी अकरा महसूल मंडळातच चांगला पाऊस झाला. रविवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिमी) ः श्रीगोंदा ः ४७, कोळगाव ः ५२, राहुरी ः ४७, पुणतांबा ः ६५, नेवासा खुर्द ः ७०, नेवासा बुद्रुक ः ७२, सलाबतपूर ः ७०, कोपरगाव ः १३०, पोहेगाव ः ४५, सुरेगाव ः ६५, रंवदे ः ५२.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...