agriculture news in marathi, rain fall in four districts, aurangabad, maharashtra | Agrowon

लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील ५२ मंडळांत शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यापैकी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळांत पावसाचा जोर अधिक राहिला.

लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील ५२ मंडळांत शुक्रवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. यापैकी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही मंडळांत पावसाचा जोर अधिक राहिला.

शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पैठण एमआयडीसी, बीडकीन, कारकीन, ढोरकीन, लाखेगाव, भोयगाव, गंगापूर, वाळूज, सिल्लेगाव  आदी ठिकाणी पाऊस सुरूच होता. लातूर जिल्ह्यातील ३९ मंडळांत पाऊस झाला. निलंगा, अहमदपूर, देवरी, आदी तालुक्‍यांत पावसाचा जोर थोडा अधिक राहिला. निलंगा तालुक्‍यातील निलंगा मंडळात २० मिलिमीटर, अंबुलगा बु. ३५, मदनसुरी ३०, कासारबालकुंदा २२, तर पानचिंचोलीत १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

अहमदपूर तालुक्‍यातील शिरूर ताजबंद मंडळात ३० मिलिमीटर, हाडोळती १६, चाकूर तालुक्‍यातील शेळगाव मंडळात १८, तर जळकोट तालुक्‍यातील घोन्सी मंडळात २४ मिलिमीटर पाऊस झाला. उदगीर तालुक्‍यातील सहा मंडळांत १ ते १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्‍यातील ६ मंडळांत २ ते १८, तर लातूर तालुक्‍यातील ५ मंडळांत १ ते १३ मिलिमीटर पाऊस झाला. 
बीड जिल्ह्यातील दोन मंडळांत पाऊस झाला. त्यामध्ये माजलगाव तालुक्‍यातील कि. आडगाव मंडळात १४ मिलिमीटर, परळी तालुक्‍यातील धर्मापुरी मंडळात २९ मिलिमीटर पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्‍याअंतर्गत येत असलेल्या सातोना व परतूर मंडळात अनुक्रमे  ५ व ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ही मंडळे वगळता उर्वरित मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

इटकळ मंडळात ५५ मिमी

उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ मंडळांत पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये सर्वाधिक तुळजापूर तालुक्‍यातील इटकळ मंडळात ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ उमरगा मंडळात १३, मुरूम १८, मिलिमीटर पाऊस झाला. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...