agriculture news in marathi, Rain fall in Osmanabad, Latur districts | Agrowon

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाने पीक नुकसान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

उस्मानाबाद/लातूर : दोन्ही जिल्ह्यांतील जवळपास ३७ मंडळांत बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लागली. चार मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हा पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

उस्मानाबाद/लातूर : दोन्ही जिल्ह्यांतील जवळपास ३७ मंडळांत बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लागली. चार मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हा पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाची सार्वत्रिक कृपा अजूनही व्हायला तयार नाही. कुठे अपेक्षेच्या पुढे जावून तर कुठे थेंबही नाही. अशा लहरी स्वरूपातच परतीचा पाऊसही पडत असल्याची प्रचिती लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अनुभवली.

लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका, हरंगुळ बु. मंडळात प्रत्येकी ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्‍यातील भादा मंडळांत सर्वाधिक ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औसा ५५, लामजना ३२, किल्लारी ३, मातोळा ४८, किनथोट २०, बेलकुंड ८, उदगीर तालुक्‍यातील मोधा ७, हेर ५, देवर्जन ३, वाढवणा बु. ४, चाकूर तालुक्‍यातील चाकूर ४, वडवळ ना. २, नळेगाव ३६, निलंगा तालुक्‍यातील निलंगा मंडळात ५८, अंबुलगा बु. ४, कासरशिरसी ५, पानचिंचोली २१, देवणी बु. ५, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील शिरूर अनंतपाळ ५, साकोळ मंडळात २ मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहर मंडळात ५१ मिलिमीटर, उस्मानाबाद ग्रामीण १४, तेर २३, ढोकी २५, बेम्बाळी ४१, पाडोळी ७२, जागजी ८, केशेगाव ३३, तुळजापूर ८५, सावरगाव ३१, नळदुर्ग ५, मंगरूळ १३०, सालगरा १७, नारगवाडी ७, मुळज ७.

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने नुकसान
उस्मानाबाद ः उस्मानाबाद शहर व परिसरात आणि तुळजापूर तालुक्यात बुधवारी (ता. तीन) पहाटे जोरदार पाऊस झाला. तर ढोकी (ता. उस्मानाबाद) परिसरात मंगळवारी (ता. २) रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मंगरुळ (ता. तुळजापूर) परिसरात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. ढोकी परिसरात उसाचे पीक आडवे झाले. केळीच्या बागांचेही नुकसान झाले. बुधवारी पहाटे तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. या मंडळात अतिवृष्टी झाली. १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर महसूल मंडळातही अतिवृष्टी झाली. ८५ मिलिमीटर पाऊस या मंडळात नोंदला गेला. उस्मानाबाद व तुळजापूर तालुका वगळता अन्य तालुक्यांत पाऊस झाला नाही.

सर्वाधिक पावसाची मंडळे (मिलिमीटरमध्ये)
 औसा तालुका ः भादा ६८
 उस्मानाबाद तालुका ः पाडोळी ७२
 तुळजापूर तालुका ः मंगरूळ १३०, तुळजापूर  ८५

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...