पावसाच्या संततधारेतही बळिराजाचा रास्ता-रोको

पावसाच्या संततधारेतही बळिराजाचा रास्ता-रोको
पावसाच्या संततधारेतही बळिराजाचा रास्ता-रोको

सोलापूर : दूध उत्पादनासाठी होणारा खर्च वाढला तरी त्यापासून उत्पादकांना मिळत असलेला दर कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले असून, गायीच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीच्या दुधाला ५० रुपये प्रतिलिटर दर मिळाला पाहिजे, या मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेने पंढरपूर- मोहोळ रस्त्यावर ईश्‍वरवठार येथे रास्ता रोको आंदोलन केले. गुरुवारी (ता. ७) सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या, पण या पावसातही सुमारे तासभर शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक विजय रणदिवे, दयावान ग्रुपचे अध्यक्ष विजय मेटकरी आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्य सरकारने गेल्या आठ महिन्यांपूर्वी २७ रुपये इतका दर जाहीर केला. मात्र, दूध संघाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत असून पूर्वी देत असलेल्या दरात कपात केली आहे, सध्या पाण्याची बाटली २० रुपयांना मिळते. दूध मात्र १९ रुपये लिटर मिळत आहे, याचा विचार शासन करणार आहे की नाही, असा प्रश्‍न या वेळी उपस्थित शेतकरी नेत्यांनी केला. आपल्या मागण्यासाठी शेतकरी संप सुरू असून, त्याची दखल राज्य सरकार घेताना दिसून येत नाही. अनेक शेतकऱ्यांनी सरकारवर आपला रोष व्यक्त केला. आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास ऊग्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com