राज्यात पावसाला पोषक हवामान  Rain-fed climate in the state
  राज्यात पावसाला पोषक हवामान  Rain-fed climate in the state

राज्यात पावसाला पोषक हवामान 

राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १९) कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १९) कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, कमी दाब क्षेत्र, पूर्व राजस्थान, सतना, जमशेदपूर, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, पूर्व राजस्थान ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे.  पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. काही भागात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आजपासून (ता. १९) विदर्भासह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. २०) राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. 

ओडिशा किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती  वायव्य मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली निवळू लागली आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह पूर्व-मध्य भारतात पाऊस वाढण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com