Agriculture News in Marathi Rain-fed climate in the state | Page 4 ||| Agrowon

राज्यात पावसाला पोषक हवामान 

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 सप्टेंबर 2021

राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १९) कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १९) कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, कमी दाब क्षेत्र, पूर्व राजस्थान, सतना, जमशेदपूर, दिघा ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून गुजरात, पूर्व राजस्थान ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला आहे. 

पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. काही भागात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आजपासून (ता. १९) विदर्भासह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. २०) राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. 

ओडिशा किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती 
वायव्य मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली निवळू लागली आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह पूर्व-मध्य भारतात पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात पाणीपातळीत वाढजळगाव ः नवरात्रोत्सवानंतर जिल्ह्याला परतीच्या...
सोलापूर जिल्ह्यात यंदा हंगामात तीन लाख...सोलापूर ः जिल्ह्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे....
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
जळगाव जिल्हा बँकेत  मविआ विरूद्ध भाजप...जळगाव : काँग्रेसने भाजपसोबत सर्वपक्षीय पॅनलमध्ये...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
ओल्या दुष्काळाची घोषणा करा अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणांतून विसर्ग बंदपुणे : परतीचा पाऊस राज्यातून परतल्याने पावसाने...
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
अन्यथा स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार :...नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारने आपसात काय गोंधळ...
सरकार साखर उद्योगासह ऊस उत्पादकांच्या...सोलापूर ः ‘‘साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे....
सोलापूर जिल्ह्यात ऊसबिलाची थकबाकी मिळेनासोलापूर ः जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात...
आदिवासी वस्तीच्या पुनर्वसनासाठी लवकर...नाशिक : ‘‘शेतकरी असो वा शेतमजूर यांची प्रगती कशी...
खानदेशात पावसाने सोयाबीन, कापसाचे नुकसानजळगाव: खानदेशात अनेक भागात शनिवारी (ता. १६)...
जळगाव : वाघूर प्रकल्पग्रस्तांना...शेंदुर्णी, जि. जळगाव : वाघूर प्रकल्पासाठी २००५...
जालना बांबू लागवडीचे देशातील मोठे...जालना : ‘‘उद्योजकांनी आपल्या आवाहनाला प्रतिसाद...
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के... सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...