राज्यात पावसाला पोषक हवामान

गुलाब चक्रीवादळाची प्रणाली अरबी समुद्राकडे गेल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली. राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Rain-fed climate in the state
Rain-fed climate in the state

पुणे : गुलाब चक्रीवादळाची प्रणाली अरबी समुद्राकडे गेल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली. राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने आज (ता. १) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.  

अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, झारखंड आणि परिसरावर हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दोन्ही प्रणालींच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. अरबी समुद्रातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे गुरुवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. 

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण :  पालघर : तलासरी ४२,  सिंधुदुर्ग : मालवण ४७, सावंतवाडी ४६, वैभववाडी ३०, ठाणे : अंबरनाथ २९, कल्याण ६३, ठाणे ६१, उल्हासनगर ३४. मध्य महाराष्ट्र :  कोल्हापूर : गगनबावडा २९.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) ः विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com