मुंबई, कोकणासह पुण्यात पावसाचा जोर वाढला

कोकणात पावसाचा जोर वाढला
कोकणात पावसाचा जोर वाढला

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही काही ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबइसह रायगड, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. रायगड जिल्ह्यातील उरण येथे सर्वाधिक १६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.     

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. तर कोकण किनाऱ्यापट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी दुपारी, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात ढगांनी दाटी केली. मध्य महाराष्ट्रातही हलके ढग होते. मुंबई उपनगरांसह, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाण्यातील संततधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोकल रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. 

मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : कुलाबा ८०, सांताक्रूझ १३१, पालघर ३०, तलासरी ५५, वसई ७२, अलिबाग १३३, महाड ४०, माणगाव ९२, माथेरान ५१, म्हसळा ९२, मुरूड ६९, पनवेल ८०, पेण ४५, पोलादपूर ४३, रोहा ७८, श्रीवर्धन ११०, सुधागडपाली ४६, तळा ७१, उरण १६७, चिपळूण ५२, गुहागर ३०, हर्णे ९५, खेड ६६, लांजा ११५, मंडणगड ६६, राजापूर ७३, रत्नागिरी १३६, संगमेश्वर ५१, देवगड ७५, दोडामार्ग ५९, कणकवली ४८, कुडाळ ४७, सावंतवाडी ५४, वैभववाडी ८८, वेंगुर्ला ४६, अंबरनाथ ५२, भिवंडी ५५, कल्याण ४३, ठाणे १४१, उल्हासनगर ८३. मध्य महाराष्ट्र : चाळीसगाव ३६, चंदगड ३३, गगणबावडा १०६, पन्हाळा ३६, महाबळेश्वर ४१, सोलापूर ३५. मराठवाडा : चाकूर ४३, किनवट ४१. विदर्भ : लाखंदूर ५५, लाखनी ४१, मोहाडी ४०, ब्रह्मपुरी ३३, नागभिड ३१, अरमोरी ४८, देसाईगंज १००, कोर्ची ४७, कुरखेडा ८६, अर्जुनी मोरगाव ६५, गोंदिया ४०, गोरेगाव ३०, सालकेसा ५६, तिरोडा ४५, हिंगणा ३०, कुही ५६, नागपूर ३०, सावनेर ३०, उमरेड ७१.

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज   पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता.४) कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथा, पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे (स्रोत : हवामान विभाग) सांताक्रूझ १३१ (मुंबई उपनगर), अलिबाग १३३, श्रीवर्धन ११०, उरण १६७ (जि. रायगड), लांजा ११५, रत्नागिरी १३६ (जि. रत्नागिरी), ठाणे १४१ (जि. ठाणे), गगणबावडा १०६ (जि.कोल्हापूर), देसाईगंज १०० (जि. गडचिरोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com