agriculture news in Marathi, Rain increased in Kokan, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मुंबई, कोकणासह पुण्यात पावसाचा जोर वाढला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही काही ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबइसह रायगड, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. रायगड जिल्ह्यातील उरण येथे सर्वाधिक १६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.     

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही काही ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबइसह रायगड, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. रायगड जिल्ह्यातील उरण येथे सर्वाधिक १६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.     

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. तर कोकण किनाऱ्यापट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी दुपारी, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात ढगांनी दाटी केली. मध्य महाराष्ट्रातही हलके ढग होते. मुंबई उपनगरांसह, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, ठाण्यातील संततधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोकल रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. 

मंगळवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : कुलाबा ८०, सांताक्रूझ १३१, पालघर ३०, तलासरी ५५, वसई ७२, अलिबाग १३३, महाड ४०, माणगाव ९२, माथेरान ५१, म्हसळा ९२, मुरूड ६९, पनवेल ८०, पेण ४५, पोलादपूर ४३, रोहा ७८, श्रीवर्धन ११०, सुधागडपाली ४६, तळा ७१, उरण १६७, चिपळूण ५२, गुहागर ३०, हर्णे ९५, खेड ६६, लांजा ११५, मंडणगड ६६, राजापूर ७३, रत्नागिरी १३६, संगमेश्वर ५१, देवगड ७५, दोडामार्ग ५९, कणकवली ४८, कुडाळ ४७, सावंतवाडी ५४, वैभववाडी ८८, वेंगुर्ला ४६, अंबरनाथ ५२, भिवंडी ५५, कल्याण ४३, ठाणे १४१, उल्हासनगर ८३.
मध्य महाराष्ट्र : चाळीसगाव ३६, चंदगड ३३, गगणबावडा १०६, पन्हाळा ३६, महाबळेश्वर ४१, सोलापूर ३५.
मराठवाडा : चाकूर ४३, किनवट ४१.
विदर्भ : लाखंदूर ५५, लाखनी ४१, मोहाडी ४०, ब्रह्मपुरी ३३, नागभिड ३१, अरमोरी ४८, देसाईगंज १००, कोर्ची ४७, कुरखेडा ८६, अर्जुनी मोरगाव ६५, गोंदिया ४०, गोरेगाव ३०, सालकेसा ५६, तिरोडा ४५, हिंगणा ३०, कुही ५६, नागपूर ३०, सावनेर ३०, उमरेड ७१.

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज  
पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता.४) कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथा, पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस
पडलेली ठिकाणे (स्रोत : हवामान विभाग)

सांताक्रूझ १३१ (मुंबई उपनगर), अलिबाग १३३, श्रीवर्धन ११०, उरण १६७ (जि. रायगड), लांजा ११५, रत्नागिरी १३६ (जि. रत्नागिरी), ठाणे १४१ (जि. ठाणे), गगणबावडा १०६ (जि.कोल्हापूर), देसाईगंज १०० (जि. गडचिरोली)

इतर अॅग्रो विशेष
अवर्षणग्रस्त माळरानावर फुलवली प्रगतशील...नगर जिल्ह्यात कायम अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील...
साठ देशी गायींच्या संवर्धनाचा आदर्शपुणे जिल्ह्यातील मंचर येथील सोनेचांदीचे पारंपरिक...
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...
काजू उत्पादन ३० टक्क्यांनी घटणारसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमध्ये झालेली अतिवृष्टी,...
द्राक्ष बागांचे पंचनामे करताना दिशाभूलनाशिक  : द्राक्ष बागांचे पंचनामा केल्यास...
कृषी कौशल्य प्रशिक्षणांद्वारे उभी...केंद्र शासनाची प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना २....
गारठा वाढला; नगर येथे नीचांकी तापमानपुणे  : उत्तरेकडून येणारे थंड वारे,...
पावसाने द्राक्ष शेतीचे ९ हजार कोटींवर...पुणे : सततच्या पावसामुळे सर्व अवस्थांमधील द्राक्ष...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना...कोल्हापूर: कर्नाटकने झोनबंदी केल्याने सीमाभागातून...
पीक नुकसानीचा अंतिम अहवाल लांबण्याची...पुणे : राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या...
शासकीय खरेदीसाठी उडीद, सोयाबीनची...परभणी: किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत...
राज्यात बहुतांंश भागांत तापमान २०...पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी...
पावसाचा सोयाबीन उत्पादकांना २२ हजार...पुणे : राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
जन्मभूमी रामलल्लाचीच; 'अयोध्या' प्रकरणी...नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून...
मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठा ७१ टक्‍...औरंगाबाद  : संपूर्ण मराठवाड्यात ऑक्‍टोबर...
कांदा साठवणुकीच्या संदर्भात प्रशासन...नाशिक : कांदा दर नियंत्रणासाठी निर्यातबंदी नंतर...
हळद पावडर उद्योगात तयार केली ओळखसांगलीची बाजारपेठ हळकुंड आणि हळद पावडरीसाठी देश-...
शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणार अनुदानपुणे ः शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-...
शेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये...समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा...