agriculture news in Marathi rain increased in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

विदर्भात पावसाचा जोर 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 जून 2021

मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील काही भागांत पावसाने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांपाठोपाठ विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या.

पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील काही भागांत पावसाने चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांपाठोपाठ विदर्भातील काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. शुक्रवारी (ता. ११) दिवसभर हवामान ढगाळ होते. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. 

सध्या काही भागांत सकाळपासून ऊन पडत असले, तरी दुपारनंतर ढग जमा होत आहे. अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहत असून, काळेकुट्ट ढग भरून येत असून पावसास सुरुवात होत आहे. गुरुवारी वाशीम जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळ, विजांचा कडकडाटही जोरात पाऊस पडला. मालेगाव (जि. वाशीम) तालुक्यात जऊळका रेल्वे येथे पडत असलेला तुफान पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे नाल्याला आलेल्या पुरात मजुरांसह बैलगाडी वाहून गेली असून, मजुरांना वाचविण्यात यश आले असले, तरी दोन बैलांचा मृत्यू झाला. अमरावती, अकोला, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा भागांतही पावसाने चांगलीच हजेरी लावली. 

कोकणातील अनेक भागांत दमदार हजेरी लावली. त्यामुळे कोकणात भात रोपवाटिकेच्या कामांना चांगलाच वेग आला असून, अनेक ठिकाणी मशागतीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. तर पूर्व भागात उन्हासह अधूनमधून ढगाळ वातावरण होते. खानदेशातही पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मराठवाड्यातही काही प्रमाणात कडक ऊन पडले होते. दुपारनंतर या भागात ढगाळ वातावरण असले तरी नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अनेक मंडळांत जोरदार पाऊस पडला. 

शुक्रवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पाऊस (मि.मी.मध्ये) : स्रोत ः हवामान विभाग 
कोकण : डहाणू ६४, पालघर ९०, वसई ५४, वाडा ५९, म्हसळा ७८, मुरूड ५१, श्रीवर्धन १०५, तळा ७१, ठाणे ८९, उल्हासनगर ४६. 
मध्य महाराष्ट्र : दहीगाव २३, लोणावळा २२.२. 
मराठवाडा : कळमनुरी २९, अहमदपूर २३, जळकोट ४०, हादगाव ३०, हिमायतनगर ६४, कंधार ४५, लोहा ३२, माहूर ६३, पालम ४७. 
विदर्भ : बार्शीटाकळी २९.८, बटकुली ३९.८, चांदूर रेल्वे ५१.६, पवनी ३३.२, तुमसर ३३.२, मेहकर ४६.९, नरखेडा ४४.८, पारशिवणी ४९.५, रामटेक ५१.५, आर्वी ४१.६, देवळी ४१.५, मालेगाव ४९.३, मंगरूळपीर८४.८, मानोरा ४४.६, वाशीम ६३.६, बाभूळगाव ५९.२, कळंब ५३, यवतमाळ ५७.३.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...